कॅन्डिडेट स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंचा तौलनिक आढावा

मित्रानो,जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धत विद्यमान बुध्दिबळ विश्वविजेता डिंग लिरेन यांच्याशी कोण दोन हात करत,  त्यांना विश्वविजेता या पदासाठी कोण, आव्हान देणार?  हे ठरवणाऱ्या कॅन्डिडेट २०२४ या स्पर्धेसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले  आहेत कॅनडातील टोरांटो शहरात ३ते २२एप्रिल दरम्यान ही स्पर्धा  होणार आहे.या स्पर्धेतील विजेता विश्वविजेत्यास आव्हान देत असल्याने या सर्व खेळाडूंचा तौलनिक आढावा घेणे ,हे कोणत्याही बुद्धिबळप्रेमींसाठी आवश्यक आहे.  या अभ्यासातून आपण कोणत्या खेळाडूला कॅन्डीडेट स्पर्धा जिंकण्याची, अधिकची संधी असेल ? याबाबत अधिक अचूक अंदाज बांधू शकतो  अर्थात या स्पर्धेतील सर्वच खेळाडू एकमेकांना तुल्यबळ आहेत मात्र तरी त्यांच्या तौलनिक अभ्यास केल्यास आपण काही आखाडे  नक्कीच  बांधू शकतो 

मित्रानो, बुद्धिबळाचा विचार करता अत्यंत महत्वाचा असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात तीन भारतीय बुद्धिबळपटू आपले नशीब अजमावत आहे. पाच वेळा  विश्वविजेता मॅग्नस कार्लसन यानां एका कॅलेंडर वर्षात दोनदा तर विद्यमान विश्वविजेता डिंग लिरेन यास  नुकतेच पराभवाचा धक्का देणारे सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद , तर  आशियाई उपविजेतेपद,., १४ वर्षाखालील विश्व विजेतेपद आणि १६ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत उपविजेतेपद, आणि मॅग्नस कार्लसन या आजमितीस सर्वाधिक  फिडे गुणांकन असलेल्या खेळाडूला पराभवाचा धक्का देणारे सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी , आणि अनेक बुद्धिबळपटूंना परभावाचा धक्का देणारे ग्रँडमास्टर  दि गुकेश हे यावेळी कॅन्डेदेत स्पर्धा खेळत आहे या प्रत्येक खेळाडूचे एक वैशिष्ट आहेविद्युत वेगाने चाली रचणे हे सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांचे वैशिष्ट आहे तर डावात नाट्यमान्यता आणून डावात विजयश्री संपादित करणे हि सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांची खासियत आहे ग्रँडमास्टर दि गुकेश यांच्या बाबत बोलायचे झाल्यास प्रतिस्पर्ध्याला विचार करावयास भाग पडेल अश्या चाली रचणे हे ग्रँडमास्टर दि गुकेश  यांच्या  खेळाचे वैशिष्ठे 

आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू कोणत्या प्रकारचीया खेळी सुरवातीला करतात याचा विचार केला तर दि गुकेश पांढऱ्याकडून खेळताना सर्वाधिक वेळा रेती ओपनिंग या पद्धतीचा तर त्याचा खालोखाल क्वीन पॉन गेम या पद्धतीचा सर्वाधिक वापर केला असल्याचे त्यांचा गेम बघून लक्षात येते काळ्या बाजूचा विचार करता ग्रँडमास्टर दि गुकेश  अनुक्रमे सिसीलीयन आणि क्वीन ग्यांबिट डिक्लाइन या पद्धतीचा वापर करताना दिसतात दि गुकेश यांनी पांढरे मोहरे घेऊन खेळताना मिळवलेल्या यशाचा विचार करता त्यांनी सर्वाधिक वेळा वजीराच्या बाजूकडे असणाऱ्या उंटासमोरील प्यादे दोन घरे चालवून (सी ४ ) सर्वात जास्त डाव आपल्या खिश्यात घातले आहेत 

सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांचा विचार करता पांढऱ्याकडून त्यांनी सर्वात जास्त वेळा क्वीन  गम्बीत डिक्लाईन या पद्धतीने डावाची सुरवात केली आहे तर दुसऱ्या क्रमांकाची पांढऱ्याकडून खेळताना क्वीन पॉन गेम या प्रकारे आपल्या खेळाची सुरवात केलेली आढळते काळ्या मोहरे घेऊन खेळताना सिसिलिया पद्धतीने आपला डाव सर्वात जास्त वेळा सुरु केल्याचे त्यांचा खेळाचे विश्लेषण करताना आढळते दुसऱ्या क्रमांकावर क्वीन पॉन या पद्धतीने डावाची सुरवात केलेली आढळते पांढऱ्याकडून खेळताना क्वीन सडांवरील प्यादे दोन घरे चालवून (दि ४ ) त्यांनी सर्वाधिक डावात विजयश्री संपादन केली आहे 

आर प्रज्ञानंद यांचा विचार करता सिसिलियन हि पद्धत त्यांची विशेष आवडती ओपनिंग असल्याचे त्यांचे खेळ बघितल्यास दिसून येते कारण पांढरे मोहरे असो किंवा काळे मोहरे असो दोन्ही वेळेस त्यांनी जास्तीत जास्त वेळा हीच ओपनिंग खेळल्याचे दिसून येते त्यांच्या विचार करता पांढरे मोहरे घेऊन खेळताना त्यांनी रेती ओपनिंग तर काळ्या कडून खेळताना क्वीन पॉन गेम चा दुसऱ्या क्रमांकाचा विचार केलेला दिसतो पांढरे मोहरे घेऊन खेळताना त्यांनी सर्वाधिक वेळा बी ३ या प्रकारे खेळून प्रतिस्पर्ध्याला पराभव स्वीकारण्यास भाग पडले आहे 

महिला खेळाडूंचा विचार करता भारताच्या सर्वात अलीकडे ग्रँडमास्टर झालेल्या आर वैशाली आणि २०१९ साली महिलांच्या गटात जलद बुद्धिबळ या उपप्रकारात विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या कोनेर हंपी या भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. या दोन्हीची कामगिरी सातत्याने वर वर जास्त असल्याचे आपणास त्यांचा खेळ बघतिलयास सहज दिसून येते आर वैशाली यांनी आतापर्यंत ४३७ डाव खेळले असून त्यापैकी १४९ डावात प्रतिस्पध्याला हार पत्करण्यास भाग पडले आहे तर कोनेरू हंपी यांचा विचार करता हीच आकडेवारी १६९३ मध्ये ६९३ अशी येते आर वैशाली यांनी खेळलेल्या डावांचा विचार करता सुमारे ३१ % डाव त्यांनी बरोबरीत सोडवले आहेत तर कोनेरू हंपी यांनी सुमारे ३६ % डावात प्रतिस्पर्ध्याला बरोबरी करण्यास भाग पडले आहे अन्य महिला बुद्धिबळपटूनाचा विचार करता हे आकडेवारी निश्चितच स्पृहणीय आहे यात शंकाच नाही 

आपल्या भारताच्या बुद्धिबळाचा इतिहाचा विचार करता महिला आणि पुरुष गटाचा एकत्रित विचार केला असता आतापर्यत सर्वाधिक असे ५ बुद्धिबळपटू कॅन्डीडेट स्पर्धा खेळात आहे कॅन्डीडेट स्पर्धेत खेळत असणाऱ्या भारतीय  बुद्धिबळपटूंनीअन्य स्पर्धामध्ये विद्यमान विश्वविजेत्याना पराभवाचे पाणी पाजले असल्याने यावेळी भारताला विश्वविजेता होण्याची नामी संधी आहे हे नक्की 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?