एका उत्तम व्यवस्थेवर विनाकारण उडालेले शिंतोडे

       

    गेला आठवडाभर टीव्हीवर कोणत्या बातम्या दाखवल्या जात आहेत ? याचा आढावा घेतल्यास आपणास सर्वाधिक वेळ पूजा खेडकर यांच्याविषयीच्या बातम्यांनी व्यापलेला दिसतो . या बातम्या देताना काही माध्यमांनी विशेषतः इंग्रजी माध्यमांनी काहीही चूक नसताना, त्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाला मध्ये खेचले सहजतेने लक्षात येते . मराठी वृत्तवाहिन्यांच्या युट्युब चॅनेलवरील प्रतिक्रिया वाचल्यातर नंतर  सर्वसाधारणपणे याच प्रकारच्या प्रतिक्रिया आपणास  बघावयास मिळतात . अमेरिकेत अशी कायम स्वरूपाची  नोकरीची हमी देणारी प्रशासकीय यंत्रणा नाही  मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर ७५ वर्षे होऊन देखील आपण ब्रिटिशकालीन प्रशासनव्यवस्था का अमलात आणत आहोत अशा त्रागा करणारा एक चर्चेचा कार्यक्रम एका सुप्रसिद्ध इंग्रजी वृत्तवाहिनीवर तितकाच किंबहुना कणभर जास्तच प्रसिद्ध असलेल्या वृत्तनिवेदकाने केलेला  मी बघितला केंद्रीय लोकसेवा अयोग्य सुद्धा भ्रष्ट झाला आहे सखोल चौकशी केल्यास हिच्यासारखे अजून ५६ अधिकारी सापडतील आय ए एस अधिकारी होणे आता फक्त पैसेवाल्या लोकांचेच काम आहे ज्या हाती पैसा  तोच  आता  होणार जिल्हाधिकारी या प्रकारच्या या प्रतिक्रिया होत्या ज्या आयोगाची कार्यपद्धती माहिती नसल्याने उमटत असल्याचे सूर्यप्रकाशाइतके  स्पष्ट आहे .मी स्वतः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वात प्रसिद्ध असलेल्या नागरी सेवा परीक्षेचा दोनदा प्रयत्न केला  आहे .त्याच्या आधारे सांगतोय पूजा खेडकर या वादात केंद्रीय लोकसेवा आयोगाला विनाकारण ओढले जात आहे पूजा खेडकर यांनी केलेल्या गैरप्रकाराच्या संबंध आयोगाशी नाही 
            केंद्रीय लोकसेवा आयोग जरी नागरी सेवा परीक्षेबाबत प्रसिद्ध असला तरी विविध प्रकारच्या १८ ते १९ प्रकारच्या परीक्षा या आयोगाकडून घेण्यात येतात. या परीक्षांना आपल्या भारतासह नेपाळी आणि भूतानी नागरिक सामोरे जात असतात त्यांची एकत्रित संख्या लाखोंच्या घरात आहे . आयोगाचे लेखी स्वरूपात असणारे पेपर भारतीय संविधानाने मान्य केलेल्या २१ भारतीय भाषांतून लिहण्याची मुभा आहे आता परीक्षा केंद्रीय स्वरूपाची असल्याने दर्जात तफावत असू नये यासाठी भाषातज्ज्ञ तसेच विषय तज्ज्ञ यांची मोठी साधनसाम्रगी आयोगाकडे आहे . केंद्रीय लोकसेवा  आयोगाचा स्पष्ट उल्लेख आपल्या संविधानात आहे . आणि अश्या प्रकारे स्पष्ट उल्लेख असणारे लोकसेवा आयोग हे एकंवेव परीक्षा मंडळ आहे . १९४९ पासून नित्यनेमाने वेळोवेळी परीक्षा घेतल्या आहेत . आयोगाने आपल्या कार्यप्रणालीत  योग्यवेळी योग्य ते बदलदेखील स्वीकारले आहेत जसे केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत १९८६ साली निबंधाचा परस्पर समाविष्ट करणे , त्याच परीक्षेत २०१२ साली पूर्वपरीक्षेतील वैकल्पिक विषय कमी करून त्या  जागी C -SAT  पेपर समाविष्ट करणे पुढे काही तुलनेने सोपे असणारे वैकल्पिक विषय घेऊन अधिक उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होत आहेत हे लक्षात आल्यावर टप्प्याटप्याने त्यांचे महतव कमी करणे. पूर्वपरीक्षेत उणे गुणांकन सुरु करणे सामान्य अध्ययन या विषयाची प्रचंड मोठ्या
प्रमाणात व्याप्ती वाढवणे  मी जरी नागरी सेवा परीक्षेचे उदाहरण दिलेले असले तरी सर्वच परीक्षेबाबत आयोगने असे बदल केलेले आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे .  
     आयोगाचे काम देशातील सर्वोत्तम बुद्धीची निवड करून त्यांची सरकारला देशाचे प्रशासन चालवायला शिफारस करणे हे आहे ही निवड करण्यासाठी  योग्य ती काळजी घेऊन परीक्षेचे नियोजन करणे,  त्यासाठी गुप्ततेच्या निकषांची पूर्णतः पूर्तता करत पेपर ठरवणे कुठेही गैरप्रकार न होता परीक्षा व्यवस्थित पार पडणे हे आहे या परीक्षेला प्रविष्ट  होणारा उमेदवार खरोखरीच त्यासाठी पात्र आहे का ?  हे आयोग त्या साठी परीक्षेचा अर्ज भरताना काही अंशी तपासत असला तरी या सारख्या परीक्षेची व्याप्ती बघता या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची याबाबत कसून तपासणी करणे शक्य नाही प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आयोग मोठ्या प्रमाणात काळजी घेतॊ हे मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातून सांगतोय . 
आयोग कधीही स्वयंपूर्ण झाल्याचा दावा करत नाही तो सातत्याने आपल्यात सुधारणा कारण्यासासाठी प्रयत्नशील आहे हे आपण या लेखात आधी बघितले आहेच पूजा खेडकर या प्रकरणातून योग्य तो बोध करत केंद्रीय लोकसेवा आयोग आपल्यात नक्की सुधारणा करेल यात कोणालाही तिळमात्र संशय असायला नको 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?