का हवा रॉबिनहूड

माझ्या कालच्या नाशिक महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांच्या विषयी पोस्टवर फेसबुकवर झालेल्या चर्चेला उत्तर देण्यासाठी ही पोस्ट आहे.कालच्या लेखाची  लिंक तुम्ही या लेखाच्या खाली बघू शकता . बहुतेक लोकांनी माझ्यावर मी राजकारणी लोकांची बाजू घेत असून प्रामाणिक पणाला तिलांजली देत असल्याचा आरोप केलाय . त्यांना मी सांगू इच्छितो की  मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही . त्यामुळे राजकारणी लोकांची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही . तर सपर्धापरीक्षेची  तयारी करणारा विद्यार्थी आहे.
माझ्या फेसबुकवरील पोस्टचा सर्वसाधारण सुर मुंढेंच्या कडक शिस्तीला कंटाळून नगरसेवकांनी आणि अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केल्याने नाशिकचे भले करणारा अधिकारी नाशिक सोडून गेला त्यांना मी सांगू  इच्छितो की , ज्या प्रमाणे आत्मविश्वास (कॉन्फिडन्स ) आणि अति आत्मविश्वास९ओव्हर कॉन्फिडन्स ) यात फरक असतो त्याचा प्रमाणे कडकपणा आणि हेकेखोर पणा यात फरक असतो . मुंढेंचा कडकपणा हा अतिरेक होता आणि "अति सर्वत्र वर्जयत्ये "या संस्कृत सुभाषितांप्रमाणे तो त्याजच होता .
माझ्या कालच्या लेखनावर दुसरा आक्षेप असा घेतला गेला की लोकप्रतिनिधीच भ्रष्टाचाराचा मार्ग बंद झाल्याने लोकप्रतिधिनी त्यांना  हटवण्यास भाग पडले त्यांना मी सांगू इच्छितो की , माझ्यावर टीका करण्याऱ्यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदान न करता  आराम केल्याने ही स्थिती आली आहे , त्यांनी मतदान न केल्याने लोकप्रतिनिधींनी गरीब जनतेस पैशाचे अमिश दाखवून मतदान आपल्याकडे झुकवले परिणामी लोकप्रतिनिधींचा निवडणूक खर्च प्रचंड प्रमाणात वाढला तो वसूल करण्यासाठी लोकप्रतिनिंधीना भ्रष्टाराचा मार्ग अनुससरावा  लागतो . जर १०० % लोकांनी जातीच्या धर्माच्या , पक्षाच्या आहारी ना जाता व्यक्तीला महत्व देऊन मतदान केले तर भारतातील भ्रष्टाचार संपण्यास वेळ लागणार नाही . .
माझ्या पोस्टवरील तिसरा आक्षेप म्हणजे त्यांच्यामुळे कर्मचारी कार्यरत झाले ते काही अंशी खरेही आहे .
 भारतीय जनता व्यक्तिपूजक असल्याचे पुन्हा एकदा मुंढे प्रकारांवरून सिद्ध झालाय . मग ही व्यक्तीपूजा नायक या हिंदी चित्रपटातील  प्रशासकीय अधिकाऱ्याची  असो अथवा दिवार या हिंदी चित्रपटातली अमिताभ बच्चन यांनी रंगवलेला पोलीस इंस्पेटर असो अथवा तुकाराम मुंढे यांची असो . भारतीय जनतेला रॉबिनहूडची गरज असतेच असे मला वाटते तुम्हाला काय वाटते ?
https://ajinkyatarte.blogspot.com/2018/11/blog-post_23.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?