कसे होणार बेक्झिट ( बेक्झिट मालिकेतील तिसरा भाग )

                     आपल्या भारतात दोन राज्यातील निवडणुका अणि अयोध्या  येथील धार्मिक वास्तुवरुन राजकरण तंग झाले असताना जगात काय  चालू आहे,   याचा आढावा घेतला असता,  आपणास सहज लक्षात येते की , गेल्या तीन वर्षांपासून साऱ्या  जगाच्या   युरोपच्या आणि युनाटेड किंग्डम या देशाच्या राजकारणातील कळीचा मुद्दा असलेल्या बेक्झिट या मुद्यावरून सध्या जगाचा श्वास रोखून धरला आहे . आपण सध्या वाचत असलेला हा लेख माझा   ब्रेक्झिट या विषयावरील तिसरा लेख आहे . या आधीच्या दोन्ही लेखाच्या लिंक या ब्लॉग पोस्ट च्या खाली दिलेल्या आहेत . तुम्ही त्यावर क्लिक करून तो वाचू शकता .
         सदर लेखन करताना ब्रेक्झिट हे युरोपीय युनियन बरोबर युनाटेड किंग्डम यांचा करार करून होणार असल्याचे आतापर्यंतचे पंतप्रधान  बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केले असून . या साठी आता मुदतवाढ घेतली जाणार नसून ठरल्याप्रमाणे ३१ ऑक्टोबर २०१९ लाच हे होणार असल्याचे  ही त्यांनी जाहीर केले आहे . त्यांनी जाहीर केलेल्या मसुद्यावरून युनाटेड किंग्डम या देशात वादळ उठले असून  त्यांच्या विरुद्ध युनाटेड किंग्डम या देशाच ह्या  विधिमंडळात अविश्वाचा ठराव मांडण्यात येणार आहे . त्यासाठी ब्रिटिश संसदेचे मागील ३७  वर्षात न झालेले शनिवारचे विशेष अधिवेशन होणार आहे . तुम्ही हे लेखन वाचत असताना कदाचित  ही प्रक्रिया पूर्ण झालेली  असेल . जर त्यांची सत्ता या मुळे गेली तर सदर  प्रकरणामुळे सत्ता गेलेले ते तिसरे पंतप्रधान असतील .
 बोरिस जॉन्सन यांनी तयार केलेल्या मसुद्यातील अत्यंत चर्चित मुदा त्यांनी नॉर्दन आयर्लंड या विषयी घेललेली भूमिका (मी या आधीच्या लेखात ही समस्या सविस्तर सांगितली आहेच . ) त्यांनी ठरवल्यानुसार जरी नॉर्दन आयलँड हा युनाटेड किंग्डमचा भाग असला तरी त्या भागात युरोपीय युनियनची आर्थिक धोरणे तशीच चालू राहतील . रिपब्लिक ऑफ आयलँड या युरोपीय युनिनचा सदस्य असलेल्या देशाबरोबर नॉर्दन आयलँडचा संसार काहीच फरक  न पडत चालू राहणार आहे . ह्या तरतुदी  विभिक्त होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर देखील पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे . पूर्णतः नवीन बाबी या ग्रेट ब्रिटन पुरत्याच लागू रहाणार आहे . म्हणजेच देशातील चार प्रांतापैकी ३ प्रांतात ( इंग्लंड , वेल्स स्कॉटलंड ) या प्रांतात एक कर प्रणाली तर राहिलेल्या एका प्रांतात नवीन नियम अशी कर प्रणाली असणार आहे . आंतरराष्ट्रीय तपासणी नाके ग्रेट ब्रिटन आणि नॉर्दन आयलँड या दरम्यान असणार आहेत . या मसुद्याच्या अन्य बाबीविषयी नंतर पुढच्या वेळेस बोलेल . याचा भारतावरील परिणाम  याच्या आधीच सांगितला तेव्हा भेटूया पुढच्या वेळेस तो पर्यंत नमस्कार


भाग दूसरा
http://ajinkyatarte.blogspot.com/2019/06/blog-post_85.html
भाग पहिला
 https://ajinkyatarte.blogspot.com/2019/02/blog-post_50.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?