बिगुल ४६ व्या अमेरिकी राष्ट्रपतीचे (भाग २ )

                                   हॅलो मित्रांनो  सध्या आपल्या  महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याची खमंग चर्चा रंगली असताना , आपल्या भारतासारखीच प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका या देशात  सुद्धा त्यांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सूर झाली आहे . ही निवडणूक कधी आहे , त्यासाठी कोण मतदान करू शकतो  आणि हे मतदान कसे  होते याची ओळख आपण माझ्या या  विषयाचा पहिल्या भागात करून घेतली आहे . आता हि माहिती सविस्तर बघूया . ज्यांना माझा पहिला भाग वाचायचा असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असणाऱ्या लिंकला भेट द्यावी .
                                                                             तर ज्याची वयाची ३५ वर्षे पूर्ण आहेत आणि जो किमान १४ वर्षे युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिकेत राहिला आहे , अशी युनाटेड स्टेट्स मध्ये जन्मलेली कोणतीही व्यक्ती युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची अध्यक्षपदाची
निवडणूक लढवू शकते . दर ४ वर्षांनी होणाऱ्या या रणसंग्रामाची सुरवात त्या आधी सुमारे दीड वर्षे आधी सुरु होते .पुढची निवडणूक ३ नोव्हेंबर २०२० रोजी  असल्याने त्याचे रणशिंग फुंकले गेले आहे .
                     अमेरिकेत डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक असे दोन प्रमुख पक्ष आहेत . या शिवाय ग्रीन पार्टी , टी पार्टी,  सोशालिस्ट पार्टी आदी पक्ष  सुद्धा आहेत . मात्र त्यांचा जनाधार फक्त १ ते ३ टक्के असल्याने त्यांचा फारशा विचार होत नाही . मुख्य लढत रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक या पक्षातच होते .
                                       या निवडणुकीची सुरवात पक्षातर्फे उमेदवारी मिळण्यापासून होते . पक्षाच्या उमेदवार ठरवण्यासाठी उत्सुक उमेदवारांना  आपली दावेदारी  सिद्ध करण्याची  प्रक्रिया सध्या सुरु आहे . अध्यक्षपदाच्या शर्यतीचा हा पहिला टप्पा अमेरिकेत दोन  प्रकारे होतो . अमेरिकेच्या काही राज्यात पक्षातर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते . या चर्चा सत्रात उत्सुक
उमेदवार त्यांची मते मांडतात . त्यानंतर उपस्थित लोक त्यांना ज्या उमेदवाराची मते पटतात त्या गटात समाविष्ट होता . हे झाल्यानंतर प्रत्येक गटातील व्यक्तींची संख्या मोजली जाते . ज्या उमेदवारांच्या गटात सर्वाधिक लोक असतात तो उमेदवार ती फेरी जिंकतो . या प्रकारला  कॉक्कस  म्हणतात .
                     दुसरा प्रकार  काही राज्यात होतो , तो  म्हणजे प्रायमरी  होय . हा प्रकार दोन प्रकारे होते . पहिल्या प्रकारात  फक्त  पक्षाचे सदस्य गुप्त मतदान करतात तर दुसऱ्या प्रकारात पक्षाचे सदस्य आणि सामान्य जनता गुप्त मतदान करातात प्रायमरी होणाऱ्या राज्यात कोणती पद्धत वापरायची याचा निर्णय राज्य पातळीवर होतो .  ही  प्रक्रिया प्रामुख्यने मंगळवारीच होते .  पहिली फेरी जर एकाच दिवशी १० ते १५ राज्यात झाली तर त्यास सुपर च्यूसडे  म्हणतात . अश्या पद्धतीने पहिली फेरी झाल्यावर दुसऱ्या फेरीचा प्रारंभ होतो .
ज्यामध्ये प्राथमिक पहिल्या पातळीवर विजयी झालेले एका स्टेडियम मध्ये एकत्र येतात . आणि सुमारे  दीड ते दोन हजार पक्षाचे सदस्य  पक्षाचा अधीकृत उमेदवार ठरवतात . त्याला नॅशनल कॅव्हसन  म्हणतात .  अश्या प्रकारे पक्षाचे अधिकृत उमेदवार ठरल्यावर या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु होतो . त्याच्याविषयी आणि शेवटच्या चौथ्या टप्याविषयी पुढच्या भागात बोलतो तो पर्यंत नमस्कार .
पहिल्या भागाची लिंक
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/11/blog-post_6.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?