गच्छंती डोनाल्ड ट्रम्प यांची (भाग दुसरा )

   
         जसजशी सन 2019ची अखेर जवळजवळ येत आहे ,तसतस्यां अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत . दिनांक 12डिसेंबरला झालेली युनाटेड किंग्डम येथील ऐतिहासिक ठरावी अशी निवडणूक त्यापैकीच एक . मात्र त्याहून वरचढ ठरावी अशी घडामोड 13 डिसेंबरला सायंकाळी टीव्ही बघताना ऐकायला मिळाली . ती होती युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियायोगाविषयीच्या महत्त्वाच्या  घडामोडीविषयी . डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग का चालवण्यात येत आहे ? महाभियोग खटल्याची सुरवात कशी झाली ? याची माहिती आपण  या  ब्लॉग पोस्टच्या पहिल्या भागातून   घेतली आहे . ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या ब्लॉग पोस्टच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे
           मित्रानो डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली कारकिदी संपायला अजून एक वर्ष , अर्थात जवळजवळ 25% कालावधी  शिल्लक आहे . त्याआधीच त्यांची खुर्ची जाण्याचा धोका निर्माण झाला आहे . 13डिसेंबरच्या घटनेने
याची शक्यता खूपच वाढली आहे .
काय झाले 13 डिसेंबरला 
हाऊस ऑफ रिपेझँटिव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचे आरोप ठेवल्यानंतर अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सिनेटच्या 40 सदस्यांच्या समावेश असलेल्या समितीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियोगाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून आपला अहवाल खुला केला ज्यात 23 सदस्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील आरोप योग्य असल्याचे मान्य केले तर 17सदस्यांनी त्यांच्यावरील आरोप चुकीचे असल्याचे सांगितले . बहुमत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेल्याने त्यांच्यावरील महाभियोगाचे संकट गडद झाले आहे .
पुढे काय होईल ?
सीएनएन या  वृत्तवाहिन्यांवरील बातमीनुसार पुढील आठवड्यात अमेरिकी काँग्रेसमध्ये यावर चर्चा होऊन मतदान होईल . जर निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लागला तर डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छती  होईल .त्यांची जागा त्यांनीच निवडणुकीच्या वेळेस ठरवलेले उपराष्ट्राध्यक्ष त्यांची जागा घेतील .
अन्य बदल काय होतील ?
याचा परिणाम पुढील वर्षी 3 नोव्हेंबर2020 ला होणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या  निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होईल . सध्या चर्चेत असणाऱ्या यूएस चायना ट्रेंड वॉर वर याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम संभवतो . मात्र तो काय होईल यावर आता सांगता येणे अवघड आहे . भारतावरील परिणामांच्या विचार करता , यूएस चायना ट्रेंड वॉरमधील बदल भारतावर परिणाम करतील अर्थात हे बदल काय होतील ? हे आताच सांगता येणे अशक्य आहे  .             जगातील सर्वात बलशाली राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षाची  खरोखरच गच्छंती होते का ?की  या  आधी दोनदा झाले त्या प्रमाणे राष्ट्राध्यक्षांच्या महाभियोगाच्या अंतिम टप्प्यात ज्या प्रमाणे काँग्रेसमध्ये मतदानाच्या वेळी तो प्रस्ताव विरोधात जास्त मते पडल्याने राष्ट्राध्यक्षाची खुर्ची वाचली तसे होते अथवा अमेरिकी इतिहासात एकदा झाले त्या प्रमाणे काँग्रेसच्या मतदानाच्या आगोदरच राष्ट्राध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा देतात ते बघणे म्हत्वाचे ठरेल मी सीएनएनवर ऐकलेल्या चर्चेनुसार प्रस्ताव बारगळण्याची जास्त चर्चा आहे , बघूया काय होते / घोडामैदान जवळचा आहे . या बाबत वेळोवेळी मी नवीन अपडेट देतच राहिल. सध्यापुरते इतकेच , नमस्कार
भाग पहिला
 https://ajinkyatarte.blogspot.com/2019/11/blog-post_10.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?