बिगुल 46व्या अमेरीकेच्या अध्यक्षाचे (भाग 6)

           

  गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या 46 व्या अमेरीकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीची रणधुमाळी आता आंतिम टप्यात आली आहे .(ज्याची मी गेल्या वर्षभरात पाच पोस्टमधून वेळोवेळी दखल घेतली आहे . ज्यांना त्या वाचायचा असतील, अश्यांसाठी मी या लेखाच्या खाली त्यांचा लिंक पेस्ट केल्या आहेत. जिज्ञांसू त्या बघू शकतात)  सुमारे  एक महिना शिल्लक राहिलेल्या या निवडणूकीच्या रणधुमाळीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या Presidential Debate आता सुरु झाल्या आहेत . निवडणूकीतील उपाध्यक्षपदाचे दावेदार असलेल्या व्यक्तींची टिव्ही चर्चा झाल्यावर हा मजकूर लिहित असताना अध्यक्षपदाचे डोमोक्रेक्टीक पक्षाचे उमेदवार असणाऱ्या जाँन बायडन आणि विद्यमान अध्यक्ष तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात टिव्हीवरील चर्चा आज भारतीय प्रमाणवेळेनुसार 30 सप्टेंबरला सकाळी साडेसहा ते आठपर्यत (अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार 29सप्टेंबर रात्री 09 .:00ET) झाली . या चर्चेचे सुत्रसंचालन  Fox या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक   यांनी केले . या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 3 तारखेला होणाऱ्या या निवडणूकीच्या आधी  तीनवेळेस दोन्ही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची टिव्हीवर चर्चा होणार आहे. त्यातील पहिली चर्चा आज झाली . अजून या चर्चा दोनदा होणार आहे .अध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या या चर्चेबरोबर उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा चर्चेच्याही तीन फेऱ्या होणार आहेत ,(त्यातील एक झाली असून दोन बाकी आहेत)

                 दिड तास झालेल्या या चर्चेत विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेदरम्यान सातत्याने जाँन बायडन आणि सुत्रसंचालक यांचे बोलणे तोडून स्वतःच बोलायला सुरवात केली .  सुत्र संचालक असणाऱ्या यांना या चर्चेत किमान चार ते पाच वेळा डोनाल्ड ट्रम्प यांना शांत बसून दुसऱ्याला बोलू द्या असे सांगावे लागले.मुख्य चर्चा संपल्यावर CNN या वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत देखील यावर तिव्र नापसंती दर्शवण्यात आली . त्यातील एका पँनेलिस्टने ही चर्चा आतापर्यतचा या प्रकारच्या चर्चेतील सर्वात नित्कृष्ट चर्चा असल्याचे  आणि चर्चा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सभ्यता सोडल्याचे मत प्रदर्शीत केले .करोना काळामुळे जर पुढील चर्चा झाली नाही तर अमेरीकी जनमत योग्य तयार होणार नाही. असेही त्याने सांगितले . दुसऱ्या एका पँनेलिस्टने डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्ध्याचा खासगी आयुष्यावर भाष्य करायला नको होते, असे मतप्रदर्शन केले .  
  मुळ चर्चेची सुरवात सध्या अमेरीकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत तात्तकालीक असणाऱ्या दोन मुद्यापैकी एक म्हणजे अमेरीकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधिशाच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर सुयोग्य व्यक्तीची नेमणूक करण्यावरुन सुरु असलेल्या वादावरुन झाली .(अमेरीकेतील न्यायाधिशांची नेमणूक अध्यक्ष करतात .एकदा ही नेमणूक झाल्यावर त्या व्यक्तीचे निधन होण्यापर्यत ती व्यक्ती सदर पदावर कार्यरत असते .नुकतेच अमेरीकेच्या सर्वोच्च न्यायालयातील एका महिला न्यायाधिशांचे निधन झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे) न्युर्याक टाईम्स या वृत्तपत्राने केलेल्या शोध पत्रीकेमुळे सुरु झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांंनी किती केंद्रीय आयकर भरला या वादावर देखील यावर चर्चा झाली .त्याखेरीज आरोग्य प्रश्नावर चर्चा करताना ओबामा केअर या मुद्दयासह करोनाच्या प्रश्नावर देखील चर्चा झाली . ओबामा केअर हा बराक ओबामा अध्यक्ष असताना गरीब अमेरीकन लोकांना वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून केलेला कायदा होता . जो डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केला .त्याचबरोबर अर्थव्यवस्था , बेरोजगारी आणि बदलते हवामान या विषयी दोघांची काय मते आहेत? हे देखील यावेळी जाणून घेण्यात आले.
मात्र मला अपेक्षीत असणाऱ्या गनपाँलिसी आणि चीन विषयक मुद्यावर चर्चा झाली नाही, कदाचित पुढच्या वेळेस होइल.
                 सकाळी साडेसहाला सुरु होणाऱ्या  या चर्चेवर होणाऱ्या चर्चा बघण्यासाठी मी जेव्हा सकाळी सहा वाजता बिबिसी  आणि सिएनएन या वृत्तवाहिन्या बघितल्या तेव्हा मला क्षणभर कळेचना आपण टिव्हीवरील चर्चा बघत आहोत . टिव्हीवरील कोणीही ओरडत नव्हता , दुसऱ्याचे बोलणे पुर्ण होण्याचा आधी बोलत नव्हता, खुर्चीवरुन उठून हातवारे करत नव्हता . कोणत्याही चर्चेदरम्यान कोणत्याही पँनेलिस्ट दुसऱ्यावर धावून जाईल असे वाटले नाही . सर्वजण दुसऱ्याचे पुर्णपणे ऐकत होते .शांतपणे प्रतिवाद करत होते .या चर्चा बघून आपल्या वृत्तवाहिन्या या अस्या वृत्तवाहिन्यांना बरेच काही शिकवू शकतील असे मला सातत्याने वाटत होते .

                    आधुनिक जगातील पहिल्या काही लोकशाहींपैकी एक असणाऱ्या या देशातील अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा हा उत्सव आता आंतीम टप्यात आला आहे. जाँन बायडन ओबामा अध्यक्ष असताना उपाध्यक्ष होते . अमेरीके बरोबर भारताचे सबंध उत्तम होण्याची प्रक्रीया ओबामा अध्यक्ष असताना नव्याने अत्यंत जोरात सुरु झाली होती , हे आपण जाणतातच .सध्या प्रसिद्ध होणाऱ्या जनमत चाचणीत सुद्धा  जाँन बायडन यांना अधिक मत मिळत आहे .ज्यामध्ये डेमोक्रेटीक अथवा रिपब्लिकन दोन्ही पक्षांचा गड म्हणून न ओळखली जाणारी (ज्याना अमेरीकेत स्विंग स्टेट म्हणतात) ओहायो , कँलिफोर्निया या राज्यांंचा देखील समावेश आहे , हे विशेष .
सध्या करोनामुळे बहुसंख्य अमेरीकी जनता पोस्टाद्वारे आपले मतदान करत आहे, ज्यामुळे अमेरीकेतील असंख्य लोकांंनी या आधीच मतदान केले आहे . त्यामुळे या चर्चाचा प्रभाव पडेल का ?अशी भिती सध्या अमेरीकेत व्यक्त केली जात आहे. ती खरी ठरेल का? हे काळच ठरवेल.
               अमेरीकेचा नवा अध्यक्ष  ठरायला आता थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे अनेक घडामोडी वेगाने घडत आहे, त्या आपणापर्यत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेलच , तूर्तास ईतकेच. नमस्कार. 
पाचव्या भागाची लिंक 

चौथ्या भागाची लिंक 

तिसऱ्या भागाची लिंक 

दुसऱ्या भागाची लिंक 


पहिल्या भागाची लिंक 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?