इयूच्या गळ्यात अडकलेले हाड ब्रेक्सिट (भाग ४ )

                                 या दिवाळीच्या दिवसात समस्त महाराष्ट्र पाऊस कधी जाणार? , महाराष्ट्राचा  मुख्यमंत्री आपल्या पदाची शपथ कधी घेतो , याकडे डोळे लावून बसलेली असताना , भारताच्या सर्वाधिक आंतराष्ट्रीय व्यापार ज्या युरोपीय युनियनशी होतो , त्या युरोपीय युनियन मध्ये वेगळीच चिंता घोर लावत आहे , ती म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारे ब्रेक्सिट कधी होणार ? बेक्सिट विषयीचा या ब्लॉगवर हा  चवथा लेख लिहीत असताना ( या आधीच्या तिन्ही लेखाची लिंक या लेखाच्या शेवटी देण्यात आली आहे. )  युरोपीय युनियनने ब्रेक्सिटसाठी युनाटेड किंग्डमच्या संसदेला ३ महिन्याची मुदतवाढ दिली आहे . आता ब्रेक्सिटसाठी  ३१ जानेवारी २०२०ही मुदत असेल . त्याच्या अगोदर युनाटेड किंग्डम मध्ये १२ डिसेंबर त्यांच्या संसदेसाठी निवडणुका होतील, असे हा लेख लिहण्यापर्यंत पंतप्रधान असलेले बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केले आहे . मात्र या निवडणूक याच्या आधी हव्यात अशी तेथील विरोधी पक्षाची भूमिका आहे . अर्थात या मागे जर निवडणूक उशिरा झाल्यास संसद भंग होऊन सुद्धा कार्यरत असणारे हंगामी मंत्रिमंडळ ब्रेक्सिटबाबत निर्णय घेण्याची भीती आहे.
                      बोरिस जॉन्सन या आधी सुद्धा यांनी  संसद भंग करण्याच्या प्रयत्न केला होता . मात्र तेथील विरोधी पक्षांनी तेथील सर्वोच्च न्यायालयात या बाबत याचिका दाखल केल्यावर तेथील न्यायालयाने हि कृती असंवैधानिक  ठरल्यावर जॉन्सन यांनी पुन्हा सूत्रे हाती घेतल्यावर इयूशी केलेल्या कराराच्या मसुदा तेथील संसदेने अमान्य केल्यावर घटनात्मक पेच निर्माण झाला होता . त्यावर तोडगा काढताना झालेल्या चर्चेत वरील उत्तर शोधण्यात आले . गेल्या सुमारे चार वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या विषयावरील नाट्य कोणते वळण घेते हे बघणे येत्या काळात उत्सुकतेचे ठरेल या नाट्यविषयीचे अपडेट्स मी तुम्हला वेळोवेळी देतच राहील तूर्तास येथेच थांबतो . नमस्कार

         
लेख तिसरा
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/10/blog-post_19.html
लेख दुसरा
http://ajinkyatarte.blogspot.com/2019/06/blog-post_85.html
लेख पहिला
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/02/blog-post_50.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?