तीन बातम्या एक रेल्वे .......

                     गेल्या आठवड्याभरात आपली भारतीय रेल्वे 3 वेळा चर्चेत आली . त्यातील दोन वेळा प्रवाश्यांशी संबंधित मुद्यांवरून चर्चेत आली . तर एकदा रेल्वेचा नियोजनाच्या बाबतीत करावयाच्या कृतीमुळे चर्चेत  आली . प्रवाश्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यातील एक बातमी प्रवाश्याना खाजगी रेल्वेची सुविधा व्यापक प्रमाणात मिळणार .अशी होती  सध्या भारतात  बनारस ते नवी दिल्ली अशी एक खाजगी रेल्वे चालवली जात आहे . आगामी काळात अजून 20खाजगी रेल्वे चालवण्याचे सरकारचे नियोजन आहे . तर दुसरी बातमी प्रवासाच्या खिश्याला कात्री लावण्याची होती . अर्थात रेल्वेत बऱ्याच मोठ्या कलावधीनंतर भाडेवाढ झाली आहे .यासाठी रेल्वेने आपल्या
सेवांचे विविध प्रकारात विभाजन केले असून  ही भाडेवाढ प्रकारांप्रमाणे  1जानेवारी 2020पासून लागू करण्यात आली आहे .   नियोजनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रेल्वेच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी रेल्वेच्या आठ विभागाचे एकत्रीकरण करण्याच्या संदर्भात ती बातमी होती . या आठ विभागापैकी 3 विभागात अधिकाऱ्यांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवापरीक्षेच्या मार्फत होत असे .या परीक्षे  अंतर्गत ज्यांची   निवड इंडियन रेल्वे सर्विस या सेवेसाठी  होत असे ते हे तीन विभाग सांभाळत . आणि उरलेल्या 5 पदांसाठी स्वतंत्र परीक्षा होत असे . हि पाच पदे अभियांत्रिकी होती . आता या सर्व पदांसाठी  एकच परीक्षा होणार आहे . आता या तिन्ही बदलाचा सविस्तर आढावा घेऊया .
प्रथमतः आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि महत्तवाची  बातमी अर्थात रेल्वेच्या भाडे संदर्भात बातमी बघूया . भारतीय रेल्वेमार्फत  17 विविध प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवल्या जातात .( ज्यांना त्या विषयी माहिती हवी असेल अश्या व्यक्तींनी माझ्या या आधी लिहलेल्या भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 3आणि 4  या ब्लॉग पोस्ट बघाव्यात  . या ब्लॉग पोस्टच्या खाली त्या लेखाच्या लिंक देण्यात आल्या आहेत .) या सतरा प्रकारच्या रेल्वेसेवांमध्ये 1st AC, General, Chair Carअसे  10प्रकारचे डब्बे असतात  . रेल्वेमध्ये झालेली दरवाढ ही  रेल्वेच्या प्रकार आणि डब्याच्या प्रकारानुसार वेगवेगळी आहे . त्या विषयी सविस्तर माहिती तुम्हाला वृत्तपत्र , वृत्तवाहिन्या आदी पारंपरिक माध्यमातून आपणास माहिती झालीच असेल .
                  प्रवाश्यांच्या  बाबतीत बोलायचे झाल्यास अजून एक बातमी चर्चेत होती , ती म्हणजे खाजगी रेल्वे . मित्रानो सध्या बनारस ते नवी दिल्ली या दरम्यान प्रयोगिक तत्वावर एक खाजगी रेल्वे चालवली जात आहे . जी प्रत्यक्ष रेल्वेमार्फत न चालवली जात रेल्वेच्या 17उपकंपन्यांपैकी एक  उपकंपनी असणाऱ्या IRCTC मार्फत चालवली जाते ( ज्यांना भारतीय रेल्वेच्या उपकंपन्यांची माहिती हवी असेल अश्या व्यक्तींनी माझ्या या आधी लिहलेल्या भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 1आणि 2 या ब्लॉग पोस्ट बघाव्यात .  या ब्लॉग पोस्टच्या खाली त्या लेखाच्या लिंक देण्यात आल्या आहेत .)  ती यशस्वी ठरल्याने आता आणखी 20 खाजगी रेल्वे चालवल्या जाणार आहेत .
                         सध्या चालवल्या जाणाऱ्या खाजगी रेल्वेत केटरिंग विभाग आणि रिझर्वेशयन हे
खाजगी स्वरूपात चालवले जात आहेत . अन्य मालकी रेल्वेकडेच आहे . पुढेही असेच व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करूया .
                  आता प्रवाश्यांवर प्रत्यक्ष फारसा परिणाम न करणारी मात्र रेल्वेच्या कार्यक्षमतेवर खूप मोठया प्रमाणवर परिणाम करणाऱ्या बातमीबाबत अर्थात  रेल्वेचा नियोजनाच्या बाबतीत करावयाच्या कृतीबाबत आलेल्या बातमी बाबत बोलूया .हा निर्णय समजण्यासाठी याची  पूर्वपीठिका समजणे अत्यावश्यक आहे . तर  भारतीय रेल्वेमध्ये ब्रिटिश कालपासून 8 विभाग कार्यरत होते . प्रत्येक विभागाचा एक विभागप्रमुख मिळून रेल्वेचे बोर्ड बनत असे  हे रेल्वेबोर्ड रेल्वेबाबत विविध निर्णय घेत असे प्रत्येक विभागाची स्वतंत्र भरती होत असे . ही भरती देखील दोन वेगवेगळ्या प्रकारे , तीन बोर्डमार्फत होत असे . त्यामुळे रेल्वे नियोजनावर खूप परिणाम होत असे . विभागाचे  हेवेदावे या वेळी वरचढ चढत .त्यामुळे रेल्वेत असणारे हे विविध विभाग , पोटविभाग , एकत्र करावेत अशी सूचना रेल्वेबाबत काय सुधारणा करता येईल या बाबत नेमण्यात आलेल्या अनेक आयोगांनी केली होती . मात्र त्या सूचना प्रत्यक्षात येत नव्हत्या . आता त्याची अमलबजावणी सुरु
झाल्याने वरील कृती झाली आहे . मात्र याची पुढील अमलबजावणी कशी होणार अर्थात रेल्वेत आगामी भरती कशी होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये . असो काही दिवसांनी  ती येईल अशी अशा व्यक्त करूया .
मित्रानो , भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम आहे . विस्ताराच्या बाबतीत जगातील चौथ्या क्रमांकाची सेवा म्हणून  भारतीय रेल्वे ओळखली जाते.  त्यामुळे तिच्यात होणारे छोटयात छोटे बदल सुद्धा खूप मोठया लोकसंखेवर परिणाम करतात त्यामुळे सदर लेखन केले आहे . या पुढील  बदलांविषयी सुद्धा लिहिलं . मात्र सध्या पुरते इथेच थांबतो . नमस्कार

चोथ्या भागाची लिंक
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/11/4_30.html
तिसऱ्या भागाची लिंक
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/07/blog-post_1.html
दुसऱ्या भागाची लिंक
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/07/2.html
पहिल्या भागाची लिंक
ttps://ajinkyatarte.blogspot.com/2019/07/blog-post_97.html.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?