ब्रेक्सिटच्या वाटेवरच्या निवडणुका (भाग 5)

       
      सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, जगाला धडकी भरेल  अश्या घडामोडी जगात घडत आहे . ब्रेक्सिटच्या वाटेवरच्या युनाटेड किंग्डम या देशात 12 डिसेंबर2019 ला होणाऱ्या निवडणुका या त्यापैकीच एक . (या ब्लॉगवरील ब्रेक्सिट विषयाची ही पाचवी पोस्ट . या आधीच्या पोस्ट  तुम्ही या ब्लॉग पोस्टच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात . ) युनाटेड किंग्डम या देशातील महत्त्वाची वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसी ने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या  निवडणूकपूर्व मतदानकाल चाचणीनुसार (pre  election exit poll ) ब्रेक्सिटच्या विरोधी भूमिका असलेल्या सोशल डेमोक्रेटिक या पक्षाला लोकांचा कल मिळत आहे . मात्र लेबर  (मजूर  पक्ष ) पक्षामार्फत विभागवार प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानंतर यामध्ये बदल होऊ शकतो .लेबर  (मजूर पक्ष ) पक्षामार्फत दिनांक 29 नोव्हेंबरला 2019 त्यांचा विभागवार जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे . 
                                   मित्रानो आपल्यापैकी  अनेकांना वाटते की युनाटेड  किंग्डममध्ये "काँझर्व्हेटिव्ह (हुजूर पक्ष ) आणि लेबर पार्टी (मजूर पक्ष ) असे दोनच पक्ष आहेत मात्र ते तितकेशे खरे नाही .यु के मध्ये 6/ 7 पक्ष आहेत . मात्र त्यातील "काँझर्व्हेटिव्ह (हुजूर पक्ष ) आणि लेबर पार्टी (मजूर पक्ष ) हे प्रमुख पक्ष आहेत . इतर पक्ष फारसे तुल्यबळ नाहीत  मात्र म्हणून ते नाहीतच असे समजणे चुकीचे आहे . त्यांचे अस्तिव युकेच्या काही भागात आहे . स्कॉटिश डेमोक्रीटीक पक्षामार्फत ब्रेक्सिट विरोधी भूमिकेसह स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यविरोधी भूमिका घेण्यात आली आहे . त्यांनी देशाच्या मूळ मुद्यावर लक्ष केंद्रित करून अन्य मुद्यांना बाजूला सारत देशाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आपल्या जाहीर नाम्यात सांगितले आहे . आपल्या एका प्रचार सभेत युकेचे सध्याचे पंतप्रधान यांनी माझ्या पक्षाला निवडून दिल्यास जानेवारी 2021 पर्यंत ऑस्ट्रोलियन पध्द्द्तीचे इमिग्रेशन सुरु राहिला असे वक्तव्य केले आहे . 
        जसजस्या निवडणुका जवळ येत आहेत , त्याप्रमाणे यातील रंगत वाढत आहे . याचा कळसाध्य 12 डिसेंबरला  साधला जाईल . तो पर्यंत या साहेबांच्या निवडणुका कोणत्या वळणावर जातात हे बघणे रंजक ठरेल . 

भाग चौथा 
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/10/blog-post.html
 भाग तिसरा
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/10/blog-post_19.html
भाग दुसरा
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/06/blog-post_85.html
भाग पहिला
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/02/blog-post_50.html




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?