ब्रेक्झीटचा गुंता सुटता सुटेना (भाग 8 )

         

         मित्रांनो, आपल्या भारतात विविध मुद्द्यांंवर विनाकारण चर्चा चालू असताना , युरोपात एका घडामोडीने युरोपातील कडाक्याचा थंडित भल्याभल्यांना घाम फोडला आहे. ही घडामोड आहे ,ब्रेक्झीटची . सध्या युरोपीय युनियन आणि युनाटेड किंग्डम यांच्यात यांच्यादरम्यान ब्रेक्झिटच्या संदर्भात ट्रान्झिशन पिरियड सुरु आहे . जो 31 डिसेंबर 2020 रोजी  पूर्ण  पूर्ण होईल .हा ट्रान्झिशन पिरियड  1  जानेवारी 2020 रोजी सुरु झाला 
 हा ट्रॅन्झिशन पिरियड संपल्यावर युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियन यातील संदर्भ संबंध कसे असतील  ? याबाबत सध्या युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियनमध्ये बोलणी सुरु आहेत . युनाटेड किंग्डमचे पंतप्रधान जॉरिस बॉन्सन्स यांच्या मते ही  बोलणी 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली असती. मात्र काही गोष्टींवर मतैक्य न झाल्याने त्या गोष्टींबाबत अजूनही बोलणी सुरूच आहेच. 
        युनाटेड  किंग्डम या चर्चेच्या दरम्यान सातत्याने नव्या  नव्या गोष्टी पुढे करत असल्याने बोलणी पूर्ण होऊ शकल्या नाहीत . जर युनाटेड किंग्डमने त्यांच्या सातत्याने नव्या नव्या गोष्टी पुढे करणे थांबवले नाही .तर या  चर्चा कधीही यशस्वी होणार नाहीत . असे युरोपीय युनियनचे म्हणणे आहे  ( मी ब्रेक्झिट या विषयी या आधी 7  लेख लिहलेले आहे ./ ज्यांना ती वाचायची असतील , त्यांच्यासाठी त्या लेखांच्या लिंक या लेखाच्या शेवटी दिलेल्या आहेत . जिज्ञासू त्या वाचू शकतात ) युनाटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली असणाऱ्या समुद्रक्षेत्रात   युरोपीय युनियनला असणाऱ्या मासेमारीच्या हक्काबाबत काय करायचे ? भविष्यात जर युनायटेड किंग्डम आणि युरोपीय युनियम यांच्यात काही मतभेद झाल्यास त्याचे निराकरण कार्याची प्रक्रिया काय  असेल ? जगाच्या इतर क्षेत्रात व्यापार कश्या पद्धतीने होईल याबाबत मतैक्य होत नाहीये . युनाटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली असणाऱ्या समुद्रक्षेत्रात   युरोपीय युनियनला पुढील 10 वर्षांसाठी परवानगी देण्यात यावी , अशी युरोपीय युनियनची मागणी आहे . ज्याला युनाटेड किंग्डम मधील काही लोकांचा विरोध आहे . 

                            ब्रेक्झिटची बोलणी अयशस्वी झाल्यास कोणताही सर्वमान्य तोडगा ना निघता ब्रेक्झिट होईल , ज्याला हार्ड ब्रेक्झिट म्हणतात. मात्र बीबीसी, स्काय न्यूज या सारख्या  सारख्या वृत्तवाहिन्यांनी  दिलेल्या वृत्तानुसार या चर्चाना मुदतवाढ मिळणे जवळपास अशक्य आहे.  त्यामुळे जानेवारी  2021 रोजी ब्रेक्झिट होणार हे जवळपास निश्चित आहे .. मात्र हे सहजतेने होते कि हार्ड ब्रेक्झिट होते , हे बघणे उसुकतेचे ठरेल .  
सातव्या भागाची लिंक 

सहाव्या भागाची लिंक 

पाचव्या भागाची लिंक 

चवथ्या भागाची लिंक 

तिसऱ्या भागाची लिंक 

दुसऱ्या भागाची लिंक 

पहिल्या भागाची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?