महाराष्ट्राला स्वतंत्र्य रेल्वेझोनची प्रतिक्षाच

आपली भारतीय रेल्वे जगात विस्ताराचा बाबत चवथ्या क्रमकांवर आहे.जर्मनी देशात जितके एकुण किलोमीटरचे रूळ आहेत,तितक्या किलोमीटरचे रूळ एकट्या २०२५ मध्ये भारतीय रेल्वेकडून टाकण्यात आले.जपानमध्ये ६०टक्के तर जर्मनीत ६७ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झाले असताना एप्रिल २०२६चा विचार करता भारतात सुमारे ९२ ते९३ टक्के मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे‌.सार्वजनिक उपक्रमाचा विचार करता जगातील सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा उपक्रम म्हणून भारतीय रेल्वेकडे बघितले जाते.भारतीय रेल्वेची ही काही उत्तम म्हणता येतील, असी वैशिष्टे असली तरी काही प्रमाणात तीला आंतरराज्य राजकारणाने पोखरले आहे,हे सुद्धा नाकारून चालणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी लवकरच शासकीय गॅझेटमध्ये भारतात रेल्वेचा १८ वा रेल्वेझोन कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे जाहिर करून हेच पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या घोषणेनुसार चालू वर्ष २०२६च्या जूलै महिन्यात दक्षिण किनारा रेल्वे (South Cosatal Railway) अस्तिवात येईल.
भारतीय रेल्वेच्या प्रशासनिक सोयीसाठी रेल्वेचे विविध झोनमध्ये विभाजन करण्यात येते.झोनच्या सीमा ठरवताना रेल्वेची सोय बघण्यात येते‌.भारतीय रेल्वे कोणत्या राज्यात तो झोन येतो, हे बघत नाही, भारतीय रेल्वेचे अनेक झोन दोन किंवा  अधिक राज्यात पसरले आहेत.असे स्पष्टीकरण भारतीय रेल्वेकडून देण्यात येत असले तरी,हे झोन आणि भारतीय राज्यांचा सीमा याचा काळजीपुर्वक विचार केला असता,आपणास एक गोष्ट लक्षात येते की, महाराष्ट्र, गोवा, आणि इशान्य भारतातील आठ राज्यांचा आणि उत्तर रेल्वेत येणाऱ्या उत्तरप्रदेश,पंजाब, हरिणाया, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड चा अपवाद वगळता प्रत्येक राज्याला स्वतंत्र्य रेल्वे झोन देण्यात आला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पश्चिम रेल्वे झोनचा विचार केला असता या झोनमध्ये राजस्थान, मध्यप्रदेश यांना लागून असलेल्या गुजरात राज्यातील काही मोजक्या भागाचा अपवाद वगळता जवळपास संपुर्ण गुजरात समाविष्ट होते. किंबहुना मुंबईतील पश्चिम उपनगरीय रेल्वे, आणि नंदूरबार जिल्ह्याचा वगळता पश्चिम रेल्वेचा भाग म्हणजे गुजरात राज्य असी स्थिती आहे. हेच चित्र भारतभर आहे.उत्तर पश्चिम रेल्वे म्हणजे राजस्थान, दक्षिण मध्य रेल्वे म्हणजे कर्नाटक, दक्षिण पश्चिम रेल्वे म्हणजे केरळम, दक्षिण रेल्वे म्हणजे तामिळनाडू, पुर्व किनारी रेल्वे म्हणजे ओडीसा (ओरिसा) पुर्व रेल्वे म्हणजे पश्चिम बंगाल, उत्तर -पुर्व रेल्वे बिहार आणि झारखंड (इशान्य भारतातील रेल्वेला सीमावर्ती रेल्वे झोन आहे) छत्तीसगढ साठी पुर्व मध्य रेल्वे, मध्यप्रदेश म्हणजे उत्तर मध्य रेल्वे असे सर्वसाधरण चित्र आहे.नाही म्हणायला मध्य प्रदेशमधील खांडवा जिल्ह्यासारखा महाराष्ट्राला लागून भाग आणि कर्नाटक सीमेला लागून असलेला भाग मध्य रेल्वेत येतो.मध्यप्रदेशची आणि कर्नाटक ची रेल्वे म्हणता येईल,अस्या उत्तर मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वेत येत नाही. आतापर्यत तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांसाठी एकच दक्षिण मध्य रेल्वे झोन होता.मात्र लेखाच्या सुरुवातीला सांगितले तसे जूलै महिन्यापासून अस्तिवात येणाऱ्या,दक्षिण किनारी रेल्वे झोनमुळे आंध्रप्रदेशसाठी स्वतंत्र्य झोन निर्माण झाला आहे. महाराष्ट्रासाठी असा झोन कोणता असा विचार करता असा विशिष्ट झोनच नसल्याचे दिसून येते.संपुर्ण मराठवाडा हा जीला तेलंगणा रेल्वे म्हणता येईल अस्या दक्षिण मध्य रेल्वेचा अंतर्गत येतो. नागपुर जिल्ह्याचा पुर्व भाग आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोली हे जिल्हे छत्तीसगढची रेल्वे म्हणता येईल असा पुर्व मध्य रेल्वेचा अंतर्गत येतात .मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे पालघर आणि नंदूरबार जिल्हा हा भाग गुजरात रेल्वे अर्थात पश्चिम रेल्वेचा अंतर्गत येतो.भारतीय रेल्वेचा भाग नसलेल्या आणि केंद्र सरकारकडून स्वतंत्र्यरीत्या कारभार करण्यात येणाऱ्या कोकण रेल्वेच्या अंतर्गत रत्नागिरी, सिंधूदुर्ग हे संपुर्ण जिल्हे तर रायगड जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग येतो. उर्वरीत महाराष्ट्र मध्य रेल्वेत येत असला तरी तो पुरेसा नाही असे मला वाटतयं
रेल्वेच्या प्रशासकीय सोयीसाठी हे झोन तयार करण्यात आले आहेत,असे कारण देण्यात असले तरी हे झोन प्रत्यक्षात त्या त्या राज्यांचे झोन झाल्याने या झोनसाठी जेव्हा परिक्षा होतात.तेव्हा त्या त्या राज्यांतील उमेदवार बाजी मारतात.महाराष्टीय युवकांना ठेंगा मिळतो.
माझ्या मते भारतीय झोनची पुन्हा एकदा नव्याने आखणी केली तरच ही समस्या सुटेल.आणि त्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी आवाज उठवायला हवा,आणि घोड पेंड खाते ते इथेच.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव

असी आहे आपली एसटी .....!