गुप्तहेरांच्या विश्वाची सफर घडवणारे पुस्तक, 'शेरलॉक्स होमच्या कथा'
गुप्तहेर आणि गुप्तहेरांचे विश्व हा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा विषय.याचे नाव ऐकले तरी भुवया उंचवणारा विषय.आपल्या मराठीत याविषयी थोडेसे कमीच बोलले गेले आहे.रा.ना वडप यांनी आपल्या कथांमधून पुढे आणत या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.मात्र वडपांखेरीज अन्य साहित्यीकांनी या विषयापासून दुरच राहणे पसंत केले.गेल्या काही दिवसात मराठीत गुप्तचर संस्थेच्या बाबत मोठ्या प्रमाणात लिहले गेले असले तरी आजदेखील गुप्तहेरांच्या कथेबाबत मराठी भाषिकांना अन्य भाषा प्रामुख्याने इंग्रजीवरच अवलूंबन रहावे लागते. इंग्रजीमध्ये स्कॉटलंडचे रहिवासी असलेल्या सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या गुप्तहेरांचा कथा संपुर्ण जगात प्रसिद्ध आहेत. या कथांचा नायक शेरलॉक होम्स नावाची व्यक्तीरेखा आहे.या नायकाचा नावावरुन शेरलॉक होम्सच्या कथा या नावाने या प्रसिद्ध आहे. मराठीसह जगभरात अनेक भाषांमध्ये या कथांचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.या अनुवादीत कथांच्या पुस्तकांपैकी एक असलेल्या आणि गोयल प्रकाशनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक व...