पोस्ट्स

नोव्हेंबर २५, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानसशास्त्राची सर्व बाजूने सविस्तर आणि रंजक पद्धतीने माहिती देणारे पुस्तक 'मनात'

इमेज
  मानसशास्त्र , आपल्या शरीरातील सर्वात विस्मयकारी अवयवव असलेल्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. काही अपवाद वगळता प्रामुख्याने कला शाखेच्या विद्यर्थ्यांनी शिकण्याचा विषय म्हणजे मानसशास्त्र . आता काही परिस्थिती वेगाने बदलतीये, अनेक हुशार विद्यार्थी ठरवून कला शाखेत प्रवेश घेत आहेत. मात्र पूर्वी ज्याला इतर कुठे प्रवेश मिळाला नाही, अश्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळवण्यासासाठी कुठे प्रवेश घ्यावा तर कला शाखेत. आणि अश्या कला शाखेतील एक विषय म्हणजे मानसशात्र . मुळात  हा विषय ज्या शाखेत प्रामुख्याने शिकवला जातो ती शाखाच दुर्लक्षित त्यामुळे विषयाकडे सुद्धा दुर्लक्ष होणे आलेच. मात्र आपल्या सर्व हालचालीवर , वर्तनावर, अन्य लोकांशी असलेल्या नातेसंबंधावर भावनांवर, पर्यायाने आपल्या संपूर्ण आयुष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे मानसशास्त्र  हि जाणीव सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत असल्याने सध्या विविध आस्थापनात नोकरी भरती करणाऱ्या व्यक्ती आपण ज्यांना भरती करून घेत आहोत र्त्यांची मानसिक स्थिती काय आहे ? हे विविध चाचण्यांतून समजून घेत आहेत.  त्यामुळे आपल्या सर्वाना मान...