पोस्ट्स

डिसेंबर ११, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीयांना आपल्या प्राचीन वैभवशाली वारस्याची जाणीव करून देणारे पुस्तक 'सहा सोनेरी पाने'

इमेज
  मानसशास्त्रात व्यक्ती स्वतःच्या विषयी जो काही विचार करते, त्यानुसार तिचे व्यक्तिमत्त्व घडते, असा एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार जर व्यक्तीने स्वतः विषयी नकारात्मकच विचार केला तर व्यक्तीचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि व्यक्तीमध्ये काही कारण नसताना स्वतः कमीपणा घेऊन दुसऱ्याला, त्याची त्या प्रकारची योग्यता नसताना देखील, मोठेपणा देतो. “मी कायमच हरण्यासाठीच जन्म झालेला आहे. मी पूर्वी कधीही जिंकलो नव्हतो; भविष्यात देखील जिंकू शकणार नाही” असे त्या व्यक्तीला वाटायला लागते. व्यक्तीला कायम त्याची चूकच सांगितल्या, त्याच्या चांगल्या बाबींची जाणीवच त्याला करून दिली नाही तर व्यक्तीमध्ये या प्रकारची मानसिक विकृती निर्माण होते, असे या सिद्धांताबाबत मानसशास्त्रज्ञ सांगतात. त्यावेळी त्या व्यक्तीला त्याच्या पूर्वायुष्यातील सकारात्मक बाबी सांगाव्या लागतात. कोणताही समाज हा व्यक्तींचा समूहच असतो. जर एखाद्या व्यक्तीसमूहातील बहुसंख्य व्यक्तींना असे न्यूनगंडाने ग्रासले तर तो समाज एकत्रितपणे नकारात्मक विचार करायला लागतो. अशा वेळी या लेखाच्या सुरुवातीला व्यक्तीबाबत सांगितले तसेच या समाजाबाब...