पोस्ट्स

विदित गुजराथी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नाशिककरांसाठी क्षण हा अभिमानाचा !

इमेज
  नाशिकने देशाला अनेक रत्ने दिली आहेत.आज अब्जावधींची व्यवसाय झालेल्या बॉलीवूडची उभारणी करणारे दादासाहेब फाळके, ब्रिटीशांना धडकी भरवणारे ज्येष्ठ  क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर सावरकर, उत्कृष्ट फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी,,ही त्यातील काही महत्त्वाची नावे.आता या नावात अजून एक नाव समाविष्ट झाले आहे.ते म्हणजे  सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी हे नाव.                  बुद्धीबळ विश्वात जागतिक स्तरावर अत्यंत मानाचे जवळपास पहिल्या क्रमाचे मानाचे समजले  जाणाऱ्या "न्यू इन चेस या नियतकालीकाच्या, मुखपृष्ठावर सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांचा फोटो प्रसिद्ध झाल्याने यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. आतापर्यंत न्यू इन चेस या नियतकालिकांमध्ये ज्यांचा फोटो मुखपृष्ठावर प्रसिद्ध होतो,अस्या खेळाडुने भविष्यात विश्वविजेते पदाला गवसणी घातण्याचा इतिहास आहे‌.तो बघता नाशिकचे भुमीपुत्र असलेले सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी हे भावी विश्वविजेते आहेत,हे सुर्याप्रकाश्याइतके स्पष्ट आहे, आणि असा खेळाडू आपल्या नाशिक शहरात राहतो ही समस्त नाशिककरांसाठी अभिमानाची...

भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होणार ?

इमेज
     या वर्षी भारतीय क्रिडाविश्वाचा विचार करता इतिहास घडला आहे. जगातील महत्त्वाच्या आठ बुद्धीबळपटुंचा सहभाग असलेल्या  कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूषांचा गटात तीन तर महिला गटात दोन बुद्धीबळपटू  हे भारतीय आहेत. विद्यमान विश्वविजेत्यांशी कोण लढत देणार ?हे कॅन्डिडेट् स्पर्धेद्वारे ठरते, हे लक्षात घेता,  भारतीय बुद्धिबळपटुंनी किती लक्षणीय कामगिरी केली आहे,हे लक्षात येते‌ .कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूष गटात आठ खेळाडू असतात या वर्षी या आठ खेळाडूंपैकी 3 म्हणजे 37.5 टक्के तर महिला गटात आठ खेळाडूंपैकी 2म्हणजे 25टक्के खेळाडू भारतीय आहेत.जगात सुमारे 190 देशात बुद्धीबळ खेळले जाते.त्याचा विचार करता आपल्या बुद्धिबळपटुंनी किती उत्तम कामगिरी केली आहे.हे लक्षात येते. वरील आकडेवारी बघता या वर्षी कोणता तरी भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होण्याची दाट शक्यता वाटते.ही अव्वल कामगिरी करणारे पुरुष बुद्धीबळपटु आहेत नाशिकचे सुपुत्र सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी, माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन यांना एकाच वर्षात दोनदा हरवण्याचा पराक्रम करणारे ग्रँडमास्टर आर.प्रज्ञानंद , आणि ग्रँडमास्टर डी गुक...

नाशिककर होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ?

इमेज
          नाशिककर होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे नाशिकचे रहिवासी असलेल्या ग्रँडमास्टर यांनी इंग्लंडमधील आइल् ऑफ मॅन या शहरात खेळविण्यात आलेल्या ग्रँड स्विस या महत्त्वाच्या स्पर्धेत मिळवलेले अभिनंदनास्पद यश होय  पाचवेळच्या विश्वेकविजेता मॅग्नम कार्लसन आणि २०२२ चा विश्वविजेता डिंग लिरेन सह आणखी दोन खेळाडू वगळता जगातील सर्व अव्वल खेळाडू या स्पर्धेत उतरले होते अश्या मात्तबर खेळाडूंना नमवत विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे   यातील विजेता आणि उपविजेता हे हे जातात सर्वात उत्कृष्ट असणाऱ्या  अशा आठ खेळाडूंसाठीच राखीव  असलेल्या कॅंडिडेट्स स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पात्र होतात आणि कॅंडिडेट्स मधील विजेता २०२२ च्या विश्वविजेत्या बरोबर ( म्हणजे चीन च्या लिंग डिरेन बरोबर )आगामी विश्वविजेतेपदासठी दोन हात करील. त्यामुळे नाशिककर असणाऱ्या ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांची विश्वविजेता होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . आणि  तो  देखील  हे विश्वीजेता होण्याच्या मार्ग ज्या स्पर्धेतू...

नाशिककरांसाठी सुवर्णक्षराने नोंदवायचा क्षण 

इमेज
    मंगळवार २१ फेरबुवारीची सायंकाळ नाशिकरांसाठी सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवावी अशीच ठरली , कारण नाशिकचे भूमिपुत्र जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानी आणि भारतीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणारे सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी विद्यमान विश्वविजेतेपदास पाचवेळा विश्वविजेते असणाऱ्या मॅग्नस कार्लसन याना पराभवावाचे पाणी पाजण्याचा भीम पराक्रम घटना यावेळी घडली . प्रो चेस टूर्नामेंट या १६ संघाच्या सामावेश असणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान इंडिया योगीज्   या संघाकडून खेळताना त्यांनी हा पराक्रम केला  मॅग्नस कार्लसन  Canada Chessbrahs या संघाकडून खेळत होते  काळ्या मोहऱ्या घेऊन विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे बुद्धिबळ खेळामध्ये पांढरे मोहरे घेऊन खेळणारा खेळाडू प्रथम चाल करत असल्याने खेळामध्ये प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करणे पांढऱ्यास काहीसे सोपे असते काळे मोहरे घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला पांढऱ्याचे आक्रमण परतवून पांढऱ्यावर प्रति आक्रमण करावे लागते ही बाब लक्षात घेता विदित गुजराथी यांनी मिळवलेल्या विजयाचे महत्व लक्षात येते     या डावद...

भारतीय बुद्धिबळपटूची विजयी घोडदौड सुरूच

इमेज
भारतीय बुद्धिबळपटूची विजयी घोडदौड सुरूच    असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे . नुकतीच कोलकात्ता येथे झालेली टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत   जलद बुद्धिबळ या प्रकारात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये पहिल्या तिन्ही क्रमांकावर भारताच्या खेळाडूंनी आपली नावे कोरून हेच सिद्ध केले आहे ही स्पर्धा मुळात युरोपातील आघाडीची स्टील कंपनी कोरस या कंपनीकडून प्रायोजित करण्यात येणारी स्पर्धा आहे काही वर्षांपूर्वी कोरस हि कंपनी टाटांनी विकत घेतल्यामुळे पूर्वीच्या कोरस स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे नामकरण टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा झाले ( एकप्रकारे हा भारताच्या उद्यमशीलतेचाच वियज आहे )   टाटा स्टील ही स्पर्धा बुद्धिबळातील विबल्डन समजली जाते या बुद्धिबळविश्वातील   अत्यंत महत्वाच्या स्पर्धेत मागच्या काही स्पर्धांप्रमाणे भारतीय बुद्धिबळपटूंनी चमकदार कामगिरी करून या आधी मिळवलेले विजय हे निव्वळ संयोग नव्हते . तर भारत   बुद्धिबळाच्या विश्वातील महासत्ता आहे त्यामुळेच हे विजय भारतीयांन...

जेव्हा नाशिककरांची मान ताठ होते

इमेज
             गेल्या आठवड्यात भारतातील समस्त माध्यमे क्रिकेट या मुळातील विदेशी आणि जेमेतेम हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच देशात खेळल्या जाणाऱ्या खेळाविषयी बोलत असताना जगातील १८० हुन अधिक देशात खेळले जाणाऱ्या , पूर्णतः स्वदेशी असणाऱ्या बुद्धिबळ या खेळातून नाशिककरांची मान जगात उंचावणारी घडामोड देखील घडली . सध्या भारतात  गुलामीचा इतिहास पुसून देशाचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे त्या प्रयत्नाला साह्यभूत ठरेल  अश्या या घटनेची माहिती देण्यासाठी आजचा लेखनप्रसंग   तर भारतात सर्वत्र गुलामीची ओळख असलेल्या क्रिकेटचा बोलबाला सुरु असताना , बुद्धिबळ या पूर्णतः आपल्या खेळात नाशिकचे भूमिपुत्र  तरुणाईचे आयकॉन , सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी युरोपीय क्लब बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले , १० खेळाडूंचा सहभाग असलेल्या  आणि साखळी पद्धतीने खेळवलेल्या या स्पर्धेत विदित यांनी ४डावात  विजय ,४ डावात बरोबरी तर फक्त एकाच डावात पराभव स्वीकारत ६ गुणांची कामगिरी करत उपविजेतेपद आपल्या खिश्यात घातले . या ...

भारतीय बुद्धिबळपटूची कौतुकास्पद कामगिरी

इमेज
        सध्या भारतीय क्रीडापटू शारीरिक असो किंवा  बौद्धिक दोन्ही ठिकाणी   आपले कसब दाखवत आहेत . इं ग्लंडच्या बर्निंगहॅम येथे सुरु असणाऱ्या राष्टकुल स्पर्धेत भारतीय खेलाडू चमकदार कामगिरी करत पदकाची लयलूट करत आहेच मात्र त्या बरोबरच तामिळनाडू राज्यातील मच्छलीपट्टणम येथे सुरु असलेल्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाड दम्यान भारताच्या सर्व सहाही संघाकडून अत्यंत चमकदार कामगिरी कऱण्यात येत आहे ज्यामुळे ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत ९ व्या फेरी अखेरीसच भारताच्या खुल्या गटातील तीन संघापैकीब  संघ आणि महिलांच्या तीन संघांपैकी ब   संघ सुवर्णपदक मिळवण्याच्या स्पर्धेत अत्यंत पुढे आहे          या स्पर्धेत नाशिकचे आयकॉन ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांच्यासह सर्वच खेळाडू चमकदार कामगिरी करत असल्याने  शनिवारअखेरपर्यंत झालेल्या  सहाही संघाचे प्रत्येकी ८  या प्रमाणे एकूण ४८  सामन्यांपैकी ६ सामन्यात हार स्वीकारत आणि   ६  बरोबरी मान्य करण्याचा अपवाद वगळता...

यशापशाचा हिंदोळक्यावर विदित गुजराथी

इमेज
           सध्या आपल्या भारतात सर्वत्र पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याबाबत चर्चा सुरु ,असताना,  समस्त बुद्धिबळ रसिकांचे लक्ष बेलग्रेड या शहरात होणाऱ्या  या वर्षातील दुसऱ्या ग्रांपी स्पर्धेचा आंनद लुटत आहे भारताचे प्रतिनिधीत्व नाशिकचे तरुणाचे आयकॉन भारताच्या बुद्धिबळ संघाचे कप्तान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि  पेन्टला हरिकृष्णन हे करत आहे फिडे नियमानुसार २०२२ या वर्षी होणाऱ्या तीन पैकी कोणत्याही दोन  ग्रांपी स्पर्धेत बुद्धिबळ खेळाडू सहभागी होऊ शकतात . आतापर्यंत एक ग्रांपी स्पर्धा झालेली आहे तर दुसरी ग्रांपी स्पर्धा सध्या सुरु आहे . या स्पर्धेला २८ फेब्रुवारी  दिमाखदार सुरुवात झाली   प्रत्यक्ष खेळाला  १ मार्च रोजी सुरु झाले या स्पर्धेतील साखळी सामने ७  मार्चपर्यंत होणार आहेत  ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूं पहिल्या ग्रांपी प्रमाणेच आपल्या गटातील उर्वरित तीन खेळाडूंशी प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूंचे एका वेळी पांढऱ्या मो...

विदित यांचे नष्टचर्य कधी संपणार ?

इमेज
                   नाशिकच्या तरुणाईचे आयकॉन  भारताचे  क्रमांक दोनचे सुपर ग्रँडमास्टर  विदित गुजराथी यांचे नष्टचर्य कधी संपणार ? असा सवाल सध्या बुद्धिबळप्रेमींकडून  करण्यात येत आहे . टाटा स्टील चेस  टूर्नामेंटमध्ये नवव्या फेरीपर्यंत अत्यंत उत्तम प्रदर्शन करत  विजयाचा दावेदर समजल्या जाणाऱ्या  विदित यांचा  पराभव दहाव्या फेरीत भारताच्याच आर प्रगण्यानंद  यांनी केला त्यानंतर ११ फेरीत बुद्धिबळाच्या विद्यमान विश्वविजेता असणाऱ्या मॅग्नस कलर्सन यांच्या बरोबर झालेला डाव वगळता त्यांचे आतापर्यंतचे प्रदर्शन काहिसे निराशाजनकच ठरले.  अर्थात कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात असे नैराश्याचे ढग येतच असतात मात्र विदित यांच्यासारखे खेळाडू त्यांच्यावर मात करत पुन्हा नव्याने उभारी घेतात क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यात देखील असा कालखंड येऊन गेला जो नर्व्हस नाईन्टी म्हणून प्रसिद्ध आहे त्यावर ज्या प्रमाणे सचिन तेंडुलकर यांनी मात  केली तसे विदित पण करतील यात एक बुद्धिबळप्रेम...

आणि नाशिककरांची मान ताठ होते.

इमेज
                 दिनांक 28जानेवारी 2022ही तारीख नाशिककरांसाठी सुर्वणाक्षरात लिहीली जाईल, असी होती. नाशिकचे सुपुत्र जगातील 19वे आणि भारतातील क्रमांक दोनचे ग्रँडमास्टर विदीत गुजराथी यांनी बुद्धीबळातील विद्यमान विश्वविजेते कार्लस मँग्नस यांच्या बरोबर टाटा स्टील चेस चँम्पियनमध्ये कठीण स्थितीतील डाव बरोबरीत सोडून आपण भविष्यातील मोठे दावेदार असल्याचे स्पष्ट केले आहे.                या डावात विदीत गुजराथी यांनी काळ्या मोहऱ्या घेवून खेळताना कठीण स्थितीत त्यांनी डाव बरोबरीत सोडवला आहे, हे विशेष . बुद्धिबळात चढाई करण्याचा विचार करता पांढऱ्या मोहऱ्या घेवून खेळणाऱ्या खेळाडूला, तो पहिला खेळत असल्याने अधिक संधी असते.काळ्याला पांढऱ्याचे आक्रमण परतवून लावत, पांढऱ्यावर आक्रमण करावे  लागते. हे आव्हान विदीत गुजराथी यांनी यशस्वी पेलल्याचे त्यांचा या डावातून दिसते.दोन्ही खेळाडूंनी राजा समोरील प्यादे दोन घरे चालवून डावाची सुरवात केली. त्यानंतर काही प्यादाच्या चाली खेळल्यानंतर दोन्ही खेळाडुंनी स्वतःच्या रंगातील उंट स्वत...

जेव्हा नाशिककरांची मान गर्वाने ताठ होते.

इमेज
            सध्या नाशिककर कोव्हिड 19 च्या वाढत्या संख्येमुळे धास्तावले असताना,  एक नाशिककर जगभरात नाशिकचेच नव्हे, भारताचे नाव उंचावत आहे. सुपर ग्रँडमास्टर विदीत गुजराथी हे त्या नाशिककराचे नाव.De  Moriaan येथे सुरू असणाऱ्या टाटा स्टिल चेस चँम्पियन स्पर्धेत  तिसऱ्या डावा अखेर अडीच गुण प्राप्त करत स्पर्धेत अभिनंदनास्पद बढत घेतली आहे. त्यांनी पहिल्या आणि तिसऱ्या डावात विजय तर दुसऱ्या  बरोबरी साधली.  टाटा स्टिल चेस चँम्पियन चे 84 वे वर्ष आहे. ही स्पर्धा फिडे या बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून दरवर्षी आयोजित करण्यात येते. टाटा स्टिल या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आहेत. त्यामुळे त्यांचा नावे ही स्पर्धा ओळखली जाते.  जसे व्हिवो आयपिएल,डिएलएफ आयपिएल वगैरे.        बुद्धिबळाच्या कॅलेंडरमधील वर्षातील सर्वात  महत्वाची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते.बुद्धिबळाच्या स्पर्धा तीन प्रकारात होतात ,क्लासिकल, रँपिड आणि ब्लिटस .त्यातील क्लासिकल या प्रकारात 13 फेऱ्यामध्ये होणारी ही स्पर्धा अत्यंत महत्ताची आहे.टा...

ब....... बुद्धिबळाचा (भाग 2)

इमेज
             सध्या ऑनलाईन पद्धतीने बुद्धिबळाचे ऑलम्पियाड सुरु आहे यामध्ये भारताचे प्रदर्शन खूपच उत्तम होत आहे. पारंपरिक माध्यमांमध्ये मात्र याविषयी फारसे बोलले जात नसल्याने या नव्या खुल्या माध्यमांचा वापर करत त्याविषयी आपणापर्यत माहिती पोहचवून बुद्धिबळपटुंचा आनंदात वाढ करण्यासाठी आजचे लेखन            तर मित्रानो , बुधवारी 8 सप्टेंबर रोजी भारताने पहिल्या डावात  इजिप्तचा पूर्णतः धुव्वा उडवला  इजिप्तचा सहा पैकी एकही खेडाळू भारताच्या  खेडाळुला पराभूत करने सोडाच, बरोबरी देखील करू शकला नाही इजिप्तच्या सहाही खेळाडूंनी भारतासमोर सपशेल नांगी टाकली ज्यामुळे भारताने इजिप्तविरुद्ध 6 विरुद्ध 0 असे निर्धोक यश मिळवले . तर दुसऱ्या डावात फ्रांसविरुद्ध विरुद्धच्या डावात भारताचा कप्तान विश्वनाथन आनंद यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी Etienne Bacrot.विरुद्धच्या डाव बरोबरीत सोडवला . तर जागतिक मानांकात 21 व्या स्थांनी आणि  भारतातील क्रमांक दोनचे   खेळाडू नाशिकचे आयकाँन गँडमास्टर विदीत गुजराथी यांनी Yanni...

नाशिकरांची मान उंचावणारे बुद्धिबळपटू

इमेज
           आज हा मजकूर लिहीत असताना (26जुलै ) स्मार्ट सिटीच्या कामामुळे,  लांबलेल्या पावसामुळे आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या अनुपलब्धतेमुळे सर्वसामान्य नाशिककर  पिचला गेलेला असताना दोन नाशिकर खेळाडू बुद्धिबळाच्या क्षेत्रात जगभरात नाशिकचे नाव उंचावत आहेत ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि  महिला इंटरनॅशनल  मास्टर प्रचिती चंद्रात्रे हे दोन ते हिरे .त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात नाशिकचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन . एक नाशिकर म्हणून मला त्यांचा  सार्थ अभिमान वाटतो .        प्रचिती चंद्रात्रे  यांनी नुकतीच 17  वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी असणारी अशियन चेस चॅम्पियनशिप  रौप्य  पदक मिळवत जिंकलेली आहे .  सर्वप्रथम जिल्हा पातळीवर स्पर्धा जिंकत  त्यानंतर राज्य पातळीवरील स्पर्धा आणि  देशपातळीवरील विजयाचा रथ तसाच ठेवत भारताचे  शालेय स्तरावरील बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व केले . आणि आशियाई स्पर्धेत ही विजयश्री खेचून आणली         ग्रँडम...