डिजीटल कचराय् नम:
सध्याचा अति जलद दळणवळणाचा काळात, आपल्याकडे एका विशिष्ठ प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत असतो.कचरा आणि दळणवळण ,चमकलात ना? कचराचा आणि दळणवळणाचा काय संबंध ,आपण काहीतरीच वाचत नाही ना, असे आपणास वाटू शकते.तर सांगतो हा आहे डिजीटल कचरा.आपल्या मोबाईल मेमरीतील नको असणारे मात्र डिलीट न केलेले व्हिडीओ, फोटो, व्हाटसप सारख्या सोशल मिडीयाचा वरील बऱ्याच दिवसात न उघडलेले ग्रुप यातून हा कचरा निर्माण होतो. हे सर्व निर्माण होण्यासाठी प्रगत दळणवळ मोठी सहाय्यक भूमिका बजावते हे आपण जाणताच.या प्रगत दळणवळणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात काढण्यात आलेला व्हिडिओ किंवा फोटो क्षणार्धात आपल्या मोबाईल मेमरीचा भाग होतो.आणि डिजीटल कचऱ्याच्या निर्मितीस भाग होतो.त्याचप्रमाणे सोशल मिडीयातील गेल्या कित्येक दिवसात न उघडलेले विविध ग्रुप देखील डिजिटल कचऱ्याच्या निर्मितीत मोठा हातभार लावतात.जरी ठराविक कालावधीनंतर मेसेज डिलीट करण्याची सोय असली तरी तूम्ही disapring हे फिचर्स वापरल्याने हा मेसेज डिलीट झाला आहे हे दाखवत त्या मेसेजची आठवण आपणास करत हे मेसेज डिजीटल कचऱ्याची निर्मिती करत आपला फोन विनाकारण हळू करतात ...