प्रत्येक कुमारवयीन मुला- मुलीने वाचलेच पाहिजे असे पुस्तक ' यस आय एम गिल्टी'
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुमारवयीन टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा ठसा त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर राहतो. या काळात जर त्यास योग्य संगत न मिळण्यास त्याचे दुष्परिणाम संबधित व्यक्तीलाआयुष्यभर भोगावे लागतात. आयुष्याचे सोने किंवा मातेरे करण्याची ताकद या कुमारवयीन आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये असते.व्यक्तीला जगाची ओळख होण्याच्या या काळातील एखादे चुकीचे पाऊल आयुष्याचा नाश करायला पुरेसे असते .असे सातत्याने म्हंटले जाते.आणि या विधानाची साक्ष आपणास पटते ती, मुनव्वर शाह लिखित आणि निराली प्रकाशनतर्फे प्रकशित ' यस आय एम गिल्टी' या २०० पानी पुस्तकातून. वाचक मित्र,मैत्रीणीनो इसवी सन २०२६ या वर्षात माझ्या वाचनाचा रोख प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन असलेल्या पुस्तकांवर असणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याच साखळीतील एक पुस्तक म्हणून मी हे एका गुन्हेगाराचे अनुभव कथन वाचले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही पुणे शहरात एके काळी खूप चर्चेत असलेल्या जोशी - अभ्यंकर खून खटल्यातील आरोपी...