पोस्ट्स

फेब्रुवारी २७, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ९ (माझे आवडते पर्यटनस्थळ )

इमेज
  मला अनेकजण विचारतात . अजिंक्य ,  तू इतके फिरतो , त्यातील तुझे सर्वात आवडते पर्यंटन स्थळ कोणते ? माझे आजचे लेखन या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी . तर मित्रांनो माझ्या आवडीची अनेक स्थळे आहेत . काही स्थळे मला तिथे जाण्याची आणि राहण्याची   सोय फार उत्तम असल्याने आवडली आहेत . काही स्थळे तेथील निसर्ग सौदर्यांमुळे आवडली आहेत . तर काही तिथे गेल्यामुळे मिळणाऱ्या शांततेमुळे आवडली आहेत . तरी या सर्वांचा एकत्रित विचार करता मला आवडलेले सर्वात उत्तम स्थळ आहे . गुजरातच्या डांग जिल्हयात असणारे सुब्बीर या तालुक्या मुख्यालयाच्या जवळ असणारे शबरीधाम - पम्पा सरोवर   हे ठिकाण .मी गेल्या वर्षी 2025ला एप्रिल 13 रोजी या स्थानाला भेट दिली. नाशिकहून गेल्यास एका दिवसात  सहज फिरून होण्यासारखे हे ठिकाण आहे . ज्यांना नाशिकहून १५० किमीच्या च्या परिसरातील स्थळे बघायची आहेत जी फारशी परिचित नाहीत त्याच्यासाठी स्वर्ग म्हणून हे स्थळ बघता येईल , मंदिर अर्ध्या तासात सहज बघून होते तसचे तलाव द...