बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेची चढती कमान
सिंगापुर येथील सेंटोसा आयलंड येथे बुद्धीबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा सुरु आहे. तिथे चीनचा नागरिक वर्तमान बुद्धिबळ विश्वविजेता डिंग लिरेन आणि २०२४चा कँडीडेट स्पर्धा विजेता आपल्या सर्वांचा आवडता लाडका सुपर ग्रँडमास्टर डी. गुकेश यांच्यांत अटीतटीची लढाई सुरु आहे. हे तूम्हाला एव्हाना माहिती झाले असेलच.भारताचे पहिले ग्रँडमास्टर असणारे भारतीय बुद्धिबळातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले विश्वनाथन आनंद हे या आधी ही स्पर्धा खेळले होते.त्यानंतर सुमारे १२वर्षांनी कोणता तरी भारतीय ही बुद्धिबळातील ही अत्यंत मानाची स्पर्धा खेळतोय.जे आपल्या समस्त भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.अमेरिका आणि रशियाचे बुद्धिबळावर असलेले वर्चस्व मोडीत काढत नार्वे, चीन आणि आपले भारतीय खेळाडू यात उत्तम कामगिरी करत आहेत आणि त्यात भारतीय खेळाडूंचा मोठा वाटा आहे,ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे हा लेख लिहण्यापर्यत स्पर्धेतील ९ सामने झाले आहेत, ज्यामध...