जाणून घेऊया पुस्तक वाचण्याच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकांविषयी (भाग ३ )
पुस्तकाच्या विश्वात सध्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल होत आहेत. हे बदल पुस्तकाच्या स्वरूपात जसे प्रिंटेड पुस्तक, इ बुक आणि ऑडिओ बुक या सर्वच प्रकारात होत आहेत त्यामुळे पुस्तकाचे वितरण साठवणूक यात देखील मोठया प्रमाणात बदल होत आहे. या बदलामुळे सध्या आहे त्या प्रकारे प्रकाशकाचे स्थान राहिला का अशा प्रश्न देखील काही प्रमाणात उपस्थित होत आहे. प्रिंटेड पुस्तकाच्या बाबत लेखकाला मेंदू म्हटल्यास ज्याला हृदय म्हणावे लागेल असा घटक म्हणजे प्रकाशक असतो.एकवेळ मेंदू काम करेनासा झाला तरी व्यक्ती कोमात जाऊन जिवंत राहू शकतो. मात्र हृदयचे तसे नसते. हृदयाचा खेळ संपला कि मानवाचा मृत्यू होतो आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा मनुष्याच्या मृत्यू म्हणजे हृदयक्रिया बंद पडणे असे समजते . हे समजून घेतल्यास पुस्तकाच्या बाबत प्रकाशक किती महत्वाचा असतो हे अंजुटे आणि सध्या पुस्तकाच्या क्षेत्रात होणारे बदल या प्रकाशकलालाच बाहेरचा रस्ता दाखवत आहेत यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे तर पुस्तकांच्या क्षेत्रातील हृदयाला अर्थात प्रकाशकला धडकी भरवणारा घटकाचे नाव आहे पुस्तक ऑन डिमांड ज्यात...