पोस्ट्स

एप्रिल २२, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुणे शहराच्या वैभवशाली वारशाचे विद्यमान प्रतीक 'पेठा (भाग २ )

इमेज
  पुणे शहर मोठे विविधरंगी आहे. आपण ज्या शहरात आता राहतोय .त्या शहराच्या आतापर्यंत न गेलेल्या भागाची किमान तोंड ओळख आपणास असावी म्हणून मी सुरु केलेल्या पुणे शहराच्या विविध भागात फिरण्याच्या गोष्टीमुळे मला याची अधिक ठळकपणे जाणीव होत आहे ,माझ्या  आतापर्यंतच्या अनुभवानुसार पुणे शहरातील प्रत्येक भागाचे स्वतःचे एक वैशिष्ट आहे. पुणे शहरातील मूळ भाग असलेल्या पेठा देखील यातून सुटलेल्या नाहीत .फार पूर्वीपासून पुणे शहराच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा भाग असलेल्या या पेठांतील विविधता मी मार्च आणि एप्रिल महिन्यात स्वतः अनुभवली. ती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी लिहिलेल्या लेखाच्या पहिल्या भागात  आठवड्यातील वारांची नावे नसलेल्या पेठांमधील मला अनुभवायास आलेली  बहुढंगी विविधता आपणास समजली.या लेखाच्या दुसऱ्या भागात आठवाड्यतील वारांच्या  नावाने  असलेल्या पेठांमधील मला जाणवलेले वैविध्य  विविधता आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी हे लेखन  सोमवार पेठेत पारंपरिक निवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आढळते. जुन्या वाड्यांसोबतच काही नवीन इमारतीही आहेत. येथे किराणा दुकाने, औषध दुकाने, लहान उद्योग ...

पुणे शहराच्या वैभवशाली वारशाचे विद्यमान प्रतीक 'पेठा (भाग १ )

इमेज
 पुणे महाराष्ट्रातील ऐतिहासिक दृष्ट्याच नव्हे तर शैक्षणिक सामाजिक सुधारणा, या साठी प्रसिद्ध असलेले तसेच भारताच्या औद्योगिक विकसत भरीव वाटा उचलणारे भारताला मोठ्या प्रमाणात परकीयचलन  मिळवून देणारे शहर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे  .पुणे शहर आपल्या अनेक  इतर ठिकाणी सहजा न आढळणाऱ्या  गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे .पुणे शहारत असणाऱ्या काही गोष्टी पेठांची परंपरा या सोलापूर,जळगाव या शहरात दिसतात . मात्र पुणे शहरातील या पेठा आणि इतर शहरातील पेठा या फक्त नावाला सारख्या आहेत बाकी या मध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे . आपण ज्या शहरात राहतो त्या शहराची आपणास माहिती असावी म्हणून मी काही दिवसापूर्वीच या पेठांना भेट दिली त्यावेळी मला आलेल्या अनुभवाचे हे कथन मी आतापर्यंत जे पुणे शहरात राहिलो त्यासारख्या जवळपास ९७ ते ९८ भाग मी सदाशिव पेठ, नवी पेठ आणि नारायण पेठांमध्ये घालवला आहे .या माझ्या नेहमीच्या रुळलेल्या अनुमानांपेक्षा माझा इतर पेठांतील अनुभव खूपच उत्तम होता  पुणे शहरातील   पेठा या प्रामुख्याने पेशवेकालीन नियोजनातून विकसित झालेल्या असून त्या काळात विशिष्ट व्यवसाय, व...