संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या शिकवणीचे सद्य काळातील महत्त्व सांगणारे पुस्तक, तूका राम दास
आपल्याकडे संतपरंपरेची मोठी परंपरा आहे. या संतांनी जीवनाविषयीच्या अनेक समस्यांवर मोठा उपदेश केला आहे. मात्र आपल्या दुर्देवाने या संताच्या शिकवणीच्याऐवजी त्यांनी केलेल्या चमत्काराचीच चर्चा जास्त होताना दिसते. जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याचा मुखातून गीता म्हणवली, भिंत चालवली.किंवा संत तूकाराम यांची कागदावर लिहलेली गाथा तीन दिवस पाण्यात राहुनसुद्धा तीन दिवसांनी जशीच्या तसी बाहेर आली.वगैरै. सध्याचा अत्यंत ताणतणावाच्या काळात या संताच्या उपदेशाचे महत्त्व अजूनच मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.संताच्या या सध्याचा काळातील शिकवणीचे महत्त्व आपणास समजते ,दैनिक लोकसत्ताच्या प्रकाशनविभागाकडून करण्यात आलेल्या 'तूका राम दास' या पुस्तकातून. संत तूकाराम यांच्या नावातील राम आणि संत रामदास यांच्या नावातील राम एकत्रच घेतलेल्या या पुस्तकातून आपणास या संताच्या शिकवणीचे सध्याचा काळातील महत्त्व समजून येते. सन २०१६साली दैनिक लोकसत्तात संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या विषयी साप्ताहिक लेखमाला प्रसिद्ध झाली होती.याच लेखमालिकेचे हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशिकमधील सुप्रसिद्ध वाचनालय सार्वजनिक वा...