पोस्ट्स

डिसेंबर ३०, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

२०२५ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

इमेज
   अंधाऱ्या    रात्री   आपण    आकाशाकडे   नजर   टाकल्यास   आपणास   आकाशाचे   नयनरम्य   विलोभनीय   दर्शन   होते  .  ज्याचे   आपल्या    सर्वांनाच   प्रचंड   आकर्षण   असते     आपण   आकाशाचे   निरीक्षण   करत   असताना   जर   एखादा   खगोलीय   अविष्कार   आकाशात   दिसत   असेल   तर   मग   सोन्याहून   पिवळे  .  या   २०२५   वर्षात   सुद्धा   अश्या   काही   घटना   आहेत   ज्यावेळी   आकाशाचे   दर्शन   करणे   अत्यंत   ऊत्तम   आहे  .  चला   तर   जाणून   घेउया   या   विषयी  .   या   खगोलीयघटनांचे   आपण   सूर्यग्रहण  ,  चंद्रग्रहण  ,  उल्का   वर्षाव  .,  धूमकेतूचे   दर्शन  ,   सूर्यमालिकेतील   ग्रहांचे ...

प्राचीन युगातील महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक, 'मुस्लिमपुर्व महाराष्ट्र'

इमेज
आपल्या महाराष्ट्र शैक्षणिक बोर्डामार्फत विविध इयत्तांमध्ये  कोणता इतिहास शिकवला जातो एक नजर टाकली तर एक गोष्ट आपणास चटकन आढळून येते ती म्हणजे नर्मदेच्या उत्तरेकडील भागातील इतिहासाचे अधिकचे प्रमाण. उतर भारताचा इतिहास शिकवताना देखील मध्ययुगीन इतिहास अधिक प्रमाणात असतो.त्यामुळे आपण जिथे रहातो त्या महाराष्ट्राचा त्यातही प्राचीन युगाबाबत आपणे काहीसे अनभिज्ञ राहतो. याबाबत माहिती करुन घेण्यासाठी शालेय पुस्तकाच्या बाहेरच्या पुस्तकांचा आपणास आधार घ्यावा लागतो. या अवांतर पुस्तकांमधील महत्त्वाची माहितीपुर्ण पुस्तके म्हणून दैनिक केसरीचे १९३० ते १९४० या दरम्यान ८वर्षे संपादक असलेल्या वासुदेव कृष्ण भावे यांनी लिहलेल्या महाराष्ट्राचा इतिहासावरील पुस्तकांचा समावेश करावाच लागेल. भावे यांनी मुस्लिम आक्रमणपुर्व कालखंडातील महाराष्ट्रावर दोन खंडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळच्या महाराष्ट्रावर आणि पेशवेकालीन महाराष्ट्रावर प्रत्येकी एका खंडात  पुस्तके लिहली आहेत‌. त्यातील पेशवेकालीन महाराष्ट्रावरील पुस्तक आणि मुस्लिम आक्रमकांच्या आधीच्या महाराष्ट्रावरील पुस्तके  मी नुकतेच वाचली....