पोस्ट्स

फेब्रुवारी १८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ८

इमेज
 मी माझ्या फिरण्यासाठी प्रामुख्याने एसटी बसचा वापर करतो जर एसटी बसचा वापर शक्य नसेल तर मी खासगी बस वाहतूकदारांचा वापर करतो . अन्य खासगी वाहतूक साधनांचा वापर मी जवळपास शून्यच्या बरोबरीने वापर करतो. हे माझ्या प्रवासाबाबतच पुरेशी माहिती असणाऱ्या अनेकांना एव्हाना चांगलेच माहिती झाले असेल. जेव्हा कधी एखाद्या नवीन व्यक्तीला मी एसटी बसचा चाहता आहे हे समजते त्यावेळी  काही वेळा  काय हे एसटी आवडू कशी शकते ? एसटी बस पेक्षा इतर प्रायव्हेट ऑपरेटर खूप ऊत्तम सेवा देतात. त्यांचा वापर करायला  काय जाते. पॆसे जवळपास सारखेच लागतात. या प्रतिक्रयेला मला सामोरे जावे लागते . काही जणांचा रोख सार्वजनिक बसवाहतुकी पेक्षा स्वतःचे वाहन काढून फिरण्यास प्राधान्य देण्यास असतो त्यांच्यामते कुठे बसची वाट बघायची बस ठीक ठिकाणी थांबत जाणार त्यात विनाकारण वेळ वाया जाणार तसेच बसमधील सहप्रवासी कसा असेल तो विक्षिप्त असेल तर काय सर्व प्रवाशाची मजाच जाणार . त्या पेक्षा स्वतःचे वाहन काढायचे हवे त्या ठिकाणी थांबायचे ते देखील हवे तेव्हडा वेळ .पूर्णतः स्वतःच्या मानाने फिरायचे   हे दोन्ही दृष्टिकोन त्यांच...

'विवेक भीमनवार' सर हे कराचं !

इमेज
  'मा.  विवेक  भीमनराव सर  स.न. वि.वि. सर सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.. !!.  आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला खऱ्या अर्थाने लोकसेवा या शब्दला सार्थ ठरवणारे  करावे या एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उमेदवार म्हणून माझ्याकडून आपल्याला सदिच्छा !! सर, गेल्या एक ते दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार अधिक उत्तम कार्यक्षम व्हावा यासाठी आपल्या आधीच्या अध्यक्षांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग आणि अन्य  लोकसेवा आयोगाचा अभ्यास दौरा केला होता. त्यांनी केलेल्या शिफारशी शक्य तेव्हढ्या लवकरात लवकर अंमलात येऊन अक्षरशः पोटाला चिमटा घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू अधिकाऱ्यांचा कष्टाचा अंत व्हावा ही आमची माफक अपेक्षा तुम्ही नक्कीच पूर्ण कराल असे म्हणायला हरकत नसावी.  सर  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार वेगाने केंद्रीय  लोकसेवा आयोगाचा धर्तीवर होत आहे .मुख्य परीक्षेची पद्धत पूर्वीप्रमाणे दीर्घोत्तरी होत आहे. ही बाबा कौतुकास पात्रच आहे यात शंका नाही. मात्र आपल...