प्रत्येकाने वाचावाच असा ग्रंथ 'लोकमान्य ते महात्मा'
आपल्या मराठीला उत्तमोत्तम संदर्भग्रंथांची मोठी दिर्घ परंपरा आहे.महाराष्ट्राच्या, भारताच्या जगाच्या इतिहास,सामाजिक जीवन,राजकीय जीवन यावर सविस्तर सखोलपणे माहिती देणारी कितीतरी ग्रंथ आपणास मराठीत आढळतात. त्याच प्रमाणे सुरवातीला एखाद्या दैनिकात,साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्त लेख मालिकेचे कालांतराने पुस्तक प्रसिद्ध केल्याचा समृद्ध इतिहास देखील मराठी पुस्तक विश्वाला आहे.आपल्या मराठीत असी अनेक पुस्तके आहेत जी ही दोन्ही निकषे, संदर्भ ग्रंथ म्हणून उत्तम मुल्य आणि प्रथमत: मालिका स्वरूपात प्रसिद्धी नंतर पुस्तक रुपाने प्रसिद्धी हे पुर्ण करतात.पुस्तकाची गुणवत्ता उत्तम आहे हे दाखवणाऱ्या या दोन्ही निकषांची पूर्तता करणाऱ्या पुस्तकांच्या मांदियाळीतील मुकुटमणी होईल असे पुस्तक म्हणजे राजहंस प्रकाशनातर्फे आणि ज्येष्ट विचारवंत ,लेखक प्राध्यापक डॉ सदानंद मोरे यांनी लिहलेले लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक. मोठ्या आकाराच्या सव्वा साडे सहाशे पानाच्या या पुस्तकाच्या दोन भागापैकी पहिला भाग मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचानालय नाशिक अर्थात सावाना च्या ग्रं...