राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारी कादंबरी 'मुबई दिनांक'
१६ नोव्हेंबर १९७९ ही फक्त एक तारीख नहिये. आपल्या मराठीतील ज्याला ऑल टाइम ग्रेट सिनेमा म्हणता येईल अश्या ' सिहासन ' या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ती तारीख आहे . आपल्या चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिगर्शक निर्माते असलेल्या जब्बार पटेल यांची कलाकृती असलेला हा चित्रपट आज त्याला निर्माण होऊन ४५ वर्षे अर्थात २५ वर्षाची एक पिढी या हिशेबाने दोन पिढ्याच्या कालावधी होत असला असला तरी कालसुसंगत वाटतो , कंटाळवाणा होत नाही. यातच त्याचे महत्त्व अधोरेखित होते. चित्रपट यशस्वी होण्यामागे चित्रपटात अभिनय करणारे कलाकार जितके महत्वाचे असतात तितकीच महत्वाची असते चित्रपटाची पटकथा. चित्रपटाची पटकथा सशक्त होणार का . यामध्ये पटकथा लिहणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच किंबहुना कणभर जास्तच महत्त्वाची असते पटकथा. ज्या कथा कादंबरीवर आधारित आहे त्याचे सशक्त असणे सिंहासन हा चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारित आहे त्या देखील तितक्याच सशक्त असल्याने चित्रपट जवळपास पन्नाशीत आला तरी आपल्याला खिळवून ठ...