एसटीचे हे बदल आपणास माहिती आहे ना?
गेले काही दिवस आपण सर्वजण महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलो असताना, आपल्या एसटीमध्ये दोन घडामोडी घडल्या आणि एक अफवा पसरली. महामंडळाकडून 'शिवशाही' हा प्रकार बंद करण्यात आल्याचा अफवेबाबत महामंडळाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आल्याने, मी त्याविषयी बोलणार नाही .महामंडळाने आपल्या बसेसच्या ताफ्यात केलेला बदलाविषयी फारसे न बोलले गेल्याने, त्याविषयी बोलण्यासाठी आजचे लेखन तर मित्रांनो, आताआतापर्यत महामंडळ, अशोक लेलँड, टाटा किंवा आयशर या कंपनीकडुन फक्त चेसीस विकत घेत असे.त्यानंतर स्वत:च्या मालकीच्या वर्कशॉपमध्ये त्यावर बस बांधणी करत असे.(एसटीच्या रत्नागिरी, पुणे, संभाजीनगर, नागपूर येथे स्व मालकीच्या कार्यशाळा आहेत) त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसाचा अपव्यय होत असे.खासगी बसवाहतूकदार याच कंपन्यांकडून थेट तयार बस विकत घेत असताना, एसटी या प्रकारचे धोरण अमंलात आणत असल्यामुळे तीचे मोठे नुकसान देखील होत असे.हे नुकसान लक्षात आल्यामुळे, महामंडळाच्या व्यवस्थपकांनी काही महिन्यापुर्वी अशोक लेलँड कडुन २४...