असे अधिकारी न झालेलेच बरे
पुणे शहरात नविन वर्षाची सुरवात झाली ती आंदोलनाने. महाराष्ट्र पोलिस दलात भावी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन तयारी करणाऱ्या उमेदवारांनी त्यासाठी होणाऱ्या परीक्षेला बसण्यासाठी वयोमर्यादेत वाढ करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले. या पुर्णत: चूकीच्या गोष्टीसाठी सुरू झालेल्या आंदोलकांना त्यांची योग्य जागा दाखवत राज्य सरकारने त्यांचा मागण्यांना वाटाण्याचा अक्षता दाखवल्या,जे योग्यच आहे. जाहिरात उशीरा आल्यामुळे काही जणांची वयोमर्यादा उलटून गेली आहे, असे अत्यंत हास्यापद कारण आंदोलकांनी दिले होते. ज्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची किमान आवश्यकता ही पदवी आहे.जी वयाच्या २१ व्या वर्षी फार फार उशीरा म्हटले तर २३ वर्षाचे झाल्यावर मिळून जाते.तीला ३०/३२ वय एव्हढे वय ही अंतीम मुदत असताना या भावी अधिकाऱ्यांना त्यात १ वर्षाची वाढ हवी होती. समजा मास्टर ड्रिग्री मिळाल्यावर त्यांनी या परीक्षेचा विचार केला तर ते २३ किंवा २५ व्या ते या परिक्षेचा अभ्यास सुरू करतील. आता हा अभ्यास सुरु केल्यावर अंतीम वयोमर्यादा होणेपर्यत जी ५ ते ७ वर्षे काही उदाहरणात तर तब्बल ९ वर्ष मिळतात. त्यात त्यांना अरे हे मला जम...