अनुभवकथन, एका कुमारवयीन प्रगल्भ मात्र योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेचे, 'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'
पुस्तकाची दुनिया मोठी अफलातून आहे. पुस्तक लेखनाचा प्रत्येक प्रकार आपणस काहीतरी शिववून जातो .ना सी फडके यांनी मराठीत मोठ्या प्रमाणात रुजवलेला निबंध असे म्हणतात तो आपल्या विचारशक्तीला चालना देतो. उत्तम काव्य 'आपणास शब्दाची जादू उलगडून सांगते. कथा कादंबरी हा प्रकार आपले ऊत्तम मनोरंज करतो तर चरित्र तसेच आत्मचरित्र हा प्रकार आपणस आयुष्यचं सुखदुःख सांगतो. एखाद्या कठीण स्थितीत प्रतिभावान माणसे कोणत्या प्रकारे स्थिर चित्र राहिली. . त्यांना याचे काय फळ मिळाले ? हे आपणास समजते. त्यामुळे आपण देखील जर आपणावर तशी स्थिती उद्भवलीच तर शांत राहायचे हे समजून घेऊ शकतो तसेच दुसऱ्याचे दुःख समजून घेण्याची आपली मानसिकता तयारहोण्यासाठी आतमचरित्रे ,चरित्रे मदत करतात असे अनेक मानस शास्त्रज्ञाचे मत आहे, याचा अनुभव घेण्यासाठी या २०२६ वर्षी मी अधिकाधिक चरित्रे आणि आतमचरित्रे वाचण्याचे ठरवले आहे. तर या विशिष्ट हेतू ठेवून सुरु केलेल्या या २०२६ च्या वाचनातले पहिले पुस्तक मी नुकतेच वाचले. ते होते 'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक' डायरी ...