भारताच्या कुटनितीची माहिती देणारे पुस्तक, 'रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढकथा'
सध्याचा भारत पाकिस्तान तणावाच्या काळात, युद्धाच्या बातम्या बघताना आपणास अरे अपल्या लष्कराला पाकिस्तानमधील दहशतवादी तळाची अचूक ठिकाणे कशी काय समजतात? असा प्रश्न पडू शकतो.तर याचे उत्तर आहे आपली गुप्तहेर संघटना, रिसर्च अँड अँनलिसीसस अर्थात रॉ या संघटनेचे जाळे.आपण अनेकदा इस्राइलची गुप्तहेर संघटनेच्या कारवाया ऐकतो याच पद्धतीचे कामकाज करणारी मात्र अनेकदा पडद्याआड राहणारी संघटना म्हणजे रॉ.मराठीत न च्या बरोबर आणि इंग्रजीतसुद्धा मोजकेच लेखन झालेल्या रॉचे कार्य नक्की कसे चालते? देशहितासाठी त्यांनी आतापर्यत कोणते कार्य केले आहे? हे अचूकपणे समजून घेयचे असेल तर आपणास मनोविकास प्रकाशनाच्या 'रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढकथा' हे पुस्तक खुप उपयोगी पडते. सध्या मुंबई सकाळ चे संपादक असलेले ज्येष्ठ पत्रकार रवी आमले या पुस्तकाचे लेखक आहेत. रवी आमले यांनी 300 पानांच्या या पुस्तकातून 24 प्रकरणाद्वारे रॉ ने केलेल्या कार्याची ओळख करून दिली आहे. मी नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या सहकार्याने नुकतेच हे पुस्तक वाचले. ...