डोरेमॉनचा मृत्य होणार ?
डोरेमॉनचा मृत्य होणार ? चमकलात ना, आपण बरोबर वाचत आहे ना?असे आपणास वाटत असेल तर सांगतो,आपण योग्यच वाचत आहे. विविध मनोरंजनाशी संबंधित युट्युब चॅनेलवर सांगण्यात आलेल्या माहितीनुसार इंडोनेशियानंतर आपल्या भारतात डोरेमॉनचे कार्टून दाखवणे बंद करण्यात येणार आहे. डोरेमॉनचे कार्टून दाखवणे बंद झाल्यामुळे तो एक प्रकारे डोरेमॉनचा मृत्यच असेल ना ? डोरेमॉनचे कार्टून बघितल्याने मुले नोबितासारखी आळशी,आणि मंदबुद्धी होत आहेत, म्हणून हे पाउल उचलावे लागले असे याबाबत इंडोनेशियनन सरकारची मालकी असलेल्या राष्ट्रीय वाहिनीच्याअधिकाऱ्यांनी सागितले होते.आता तोच हास्यास्पद मुद्दा घेत भारतात सुद्धा डोरेमॉन बंद करण्याचा बाबत हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. टी.व्ही.चा लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात परीणाम होतो.तसेच मानवी मन सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेकडे सहजतेने झुकते.हा मुद्दा जरी क्षणभर मान्य केला.तरी नोबितामुळे थेट बंद करण्याचा निर्णय माझ्यामते रोगापेक्षा इलाज भयंकर या वर्गवारीत मोडतो. पालकांनी आपली पाल्ये हुशार असलेल्या डेकीसुकी किंवा सर्वांना समजून घेणाऱ्या सिजूकाचा आद...