विनोदवीराचा पडद्यामागील संघर्ष दाखवणारे पुस्तक, 'हसरे दु:ख'
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली पायद्वारे सतत पोहणे सुरू असते.बदकांच्या पायांची हालचाल होत असल्याने वरवर शांत वाटणारे पाणी सतत वेगाने धुसमळत असते. मात्र वरून बघताना आपणास ते पाणी शांत भासते,आत चालणाऱ्या वादळाची आपल्याला कल्पना देखील येत नाही. कोणत्याही सुप्रसिद्ध माणसाचे व्यक्तीमत्व देखील काहीसे असेच असते. ज्या कारणासाठी तो प्रसिद्ध झाला, त्या पातळीपर्यत पोहोचण्यासाठी त्याने घेतलेले सर्वच्या सर्व कष्ट बाहेर येतीलच असे नाही. लोकांनी गरज नसता केलेले मात्र तरी देखील हसत हसत सहन केलेले अपमान, मेहनत लोकांपर्यत पोहचलेलेच असे नाही. एखाद्या यशस्वी व्यक्तीमत्वाचा आपण सत्कार करत असू तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भलेही हास्य दिसत असले तरी त्या हसऱ्या चेहऱ्यामागची भावना या स्थितीपर्यत पोहचण्यासाठी केलेले कष्ठ आठवून मनातल्या मनात रडत सुद्धा असू शकते. याच हसऱ्या दु:खामगाची वेदनेची कारुण्यातेची आपल्याशी भेट होते, राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि भा.द.खेर लिखित 'हसरे दु:ख या पुस्तकात.नाशिकमधील सर्वात ज...