भारतीय बुद्धिबळ क्षेत्राची वर्षाखेर गोड!
बुद्धिबळ प्रौढ पुरुष गटात क्लासिकल (पारंपारीक) पद्धतीने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वात कमी वयात विश्वविजेतेपद मिळवण्याचा भीम पराक्रम ग्रँड मास्टर डी.गुकेश यांनी करून काहीच दिवस होत नाही. तोच भारतीय बुद्धिबळप्रेमींना आनंद देणारी अजून एक बातमी २९डिसेंबर रोजी येवून धडकल्याने, भारतीयांना अक्षरश:आकाश ठेंगणे झाले.भारतीय प्रमाणवेळेनुसार २७ते २९ डिसेंबर या दरम्यान रात्री साडेबारा ते पहाटे चार या वेळात न्युयॉर्क येथे खेळवण्यात (न्युयॉर्कच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार २६ते २८डिसेंबर दुपारी अडीच वाजता )आलेल्या जागतिक प्रौढ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा महिला गटात भारताची क्रमांक एकची खेळाडू ग्रँडमास्टर कोनेरु हंपी यांनी विजेतेपद मिळवत रॅपिडचे विश्वविजेतेपद पटकावल्याची,हीच ही बातमी. तूम्हाला हे वाचून प्रश्न पडला असेल हे काय? गुकेश तर आताच विश्वविजेता झाला आता हे काय ? नविन.तर सांगतो जागतिक स्तरावर बुद्धिबळ स्पर्धा गटात खेळवण्यात येतात या गटाचे वयानुसार ३गट पडतात .12 वर्षाखालील खेळाडू ज्या गटात खेळतात त्यास सब ज्युनियर गट म्हणतात. खेळाडु 12 वर्षापेक्षा मोठा मात्र 19 वर्षा...