वाच ग घूमा ...काय मी वाचू ?( माझे वाचन भाग५)
मला अनेकाकडून बऱ्याचवेळा एक प्रश्न विचारला जातो ? अजिंक्य मला वाचायला एखादे पुस्तक सुचव. तू इतकी पुस्तके वाचतो तुला माहिती असेलच. मला हा प्रश्न विचारला की माझाच त्याला प्रतीप्रश्न विचारतो तूला कोणती पुस्तके वाचायला आवडतात,?कथासंग्रह, कादबरी, काव्यसंग्रह, नाटके, माहितीपर की ना.सी फडके यानी मराठीत मोठ्या प्रमाणात आणलेला निबंंध हा प्रकार? माझ्या या प्रश्नावर जर समोरच्या व्यक्तीने त्याचा आवडता प्रकार सांगितला आणि त्याविषयी माझ्याकडे माहीती असेल तर मी त्याला पुस्तक सुचवतो. मात्र ज्यांचे वाचन मुळातच कमी आहे अशी व्यक्ती माझ्या प्रश्नाने गडबडते. ती म्हणते माझे असे काही ठरलेले नाहीये.मग मला त्याला सांगावे लागते,समोर येईल ते वाच.सतत वाचले की तूला समजेल तूला काय वाचायला आवडते.एकदा प्रकार समजला की पुन्हा माझ्याकडे ये.मी तूला पुस्तके सुचवतो. मी आतापर्यत जी पुस्तके वाचली आहेत, त्यावेळी आलेल्या अनुभवानुसार किंवा पुस्तके वाचणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकल्या आहेत त्यानुसार सांगतोय वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आवडीच्या विषयावरची पुस्तके सुरवातीच्या काळात मिळणे आवश्यक ठरते.जर त्यावे...