पोस्ट्स

फेब्रुवारी २४, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समाजाच्या एका भीषण वास्तवाचे वास्तविक स्वरूप दखवणारे पुस्तक. 'उपरा'

इमेज
 पुस्तकाचे विविध प्रकार असतात जसे कथासंग्रह कांदबरी नाटक वगैरे हे आपणाला माहिती असेलच.  या प्रत्येक प्रकारचे काही फायदे तोटे आहेत. त्यातील चरित्र या प्रकारचा विचार  केला असता आपणास मोठ्या प्रमाणात सकारात्मकता मिळू शकते अरे या व्यक्तीने इतक्या अडचणीतून प्रवास केला आहे आपल्या अडचणी तर यापुढे अतिशय शुल्लक आहेत आपण परिस्थिती बदलण्यास प्रयत्न केलाच पाहिजे  हा विचार आपणास चरित्र आणि आत्मचरित्र वाचनातून मिळू शकतो. तसेच चरित्रे वाचल्यास आपणास दुसऱ्याच्या संघर्षाचे ज्ञान होत असल्याने जर एखादा व्यक्ती संघर्ष करत असल्यास संघर्ष करत असलेल्या व्यक्तीविषयी काहीसे ममत्व देखील निर्माण होते असे अनेक मानस शास्त्रज्ञ सांगत असतात  याशिवाय ज्या व्यक्तीने चरित्र किंवा आत्मचरित्र लिहले आहे त्या व्यक्तीने ते लिहताना त्या व्यक्तीला  समाजातील विविध समाजघटकांचा त्यास काय अनुभव आलाया विषयी देखील लिहले असते  त्या अर्थाने चरित्रे आत्मचरित्रे समाजाचा आरसा देखील ठरतात. चरित्र वाचनातून होणारे हे फायदे लक्षात घेत या २०२६ अर्शी माझ्यावाचनाला काहीसे वळण लागावे म्हणून य वर्षी जास्तीत जास्...

जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी ( भाग 2)

इमेज
  पुस्तकाच्या विश्वाचा विचार करता प्रमुख घटक असलेल्या वाचक आणि प्रकाशक या मुख्य मुद्यांच्या अवतीभोवती फिरणारे अनेक घटक आहेत मात्र त्यांची चर्चा होईलच असे नाही किंबहुना  त्यावर चर्चा करायची गरजच ती काय असा सूर सहजतेने उमटू शकतो. मात्र पुस्तकाच्या विश्वच सविस्तर आढावा घेयचा असल्यास ते आवश्यक ठरतात. त्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या भागाविषयी आणि टीव्हीवर आणि युट्युब वरील अस्तित्वाविषयी आपण लेखाच्या पहिल्या भागात बघितले होते या दुसऱ्या लेखात आपण पुस्तकाविषयीची ऍप्लिकेशन आणि सोशल मीडियावरील अस्तित्व या विषयी बोलूया .            तर वाचक मित्रानो पुस्तकाबविषयीचे हे विश्व अगदी मराठी भाषेचा विचार करता देखील अत्यंत  समृद्ध आहे सोशल मीडियात त्यातही प्रामुख्याने टेलिग्राम मध्ये पुस्तकविषयीचे अनेक ग्रुप आहेत.  ज्यावर पुस्तकाच्या पीडीएफ मोठ्या संख्येने शेअर केलेल्या असतात त्यामुळे आपण सहजतेने विविध पुस्तके वाचू शकतो अर्थात प्रत्यक्ष प्रिंटेड पुस्तक वाचण्याची मजा यामध्ये येत नसली तरी दुधाची तहान ताकावर या वाक्यप्रचारानुसार हे ही नसे थोडके. व्हाट...