सहजसोप्या शद्बात अर्थशास्त्राचा संकल्पना सांगणारे पुस्तक ,'अर्थजिज्ञसाा
अर्थशास्त्र, आपल्या रोजच्या जीवनात पदोपदी सामोरे जावे लागणारा विषय. रोजच्या जगण्यात आपण भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर गोष्टी विकत घेतो, याचे दर महागाईशी निगडीत असतात.महागाई या घटकाचा शास्त्रीय अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपल्याकडे जरासे पैसे साठले की,ते आपण विविध ठिकाणी गुंतवतो .ही गुंतवणूक करण्याचे मार्ग अपणास अर्थशास्त्र शिकवतो.आपण एखादी गोष्ट खरेदी केल्यावर जी.एस.टी हा कर भरतो. देशातील कररचनेचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपण रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी वापरतो त्यातील काही आपल्या देशात तयार झालेल्या नसतात तर इतर देशातून आपल्या देशात आयात झालेल्या असतात तर आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू उत्पादक जास्त नफा मिळवण्यासाठी दुसऱ्या देशात निर्यात करतात या आयात निर्यातीचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपण शिक्षण झाल्यावर रोजगाराचा संधी शोधतो, देशातील रोजगाराच्या संधी निर्माण होण्यात अर्थशास्त्र महत्त्वाची भुमिका बजावते.या आणि या सारख्या असंख्य बाबींमुळे अर्शशास्त्र आपणासी जोडले गेले आहे. सध्याचा धावपळीच्या स्पर्धेच्या जगात तर ही जोडणी दिवसोंदिवस अधिकच घट्ट होताना आपल्याला दिसत...