पोस्ट्स

फेब्रुवारी ८, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिकचा इतिहास , समृध्द वारसा सांगणारे पुस्तक,'नासिक डायरी'

इमेज
नाशिक, रंगपंचमीच्या दिवशी रहाडामध्ये उतरुन रंग खेळण्याची अनोखी प्रथा असलेले शहर, कुरमुऱ्यांचा तिखट चिवडा, मिसळ आणि वाइनसाठी प्रसिद्ध असलेले शहर,आदिवासी ,खानदेशी ,आणि पश्चिम महाराष्ट्राच्या संगमावर वसलेले शहर म्हणजे नाशिक., दक्षीण काशी असी ओळख असलेले तांब्याच्या वैशिष्टपुर्ण भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणजे नाशिक.या  नाशिकला फार पुर्वीपासूनचा इतिहास आहे, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आतापर्यतच्या वाटचालीत,इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अनेकांची जन्मभुमी कर्मभुमी नाशिक शहर आहे.या नाशिक शहरालगत असलेल्या लेण्यांना मोठा वैभवशाली इतिहास आहे. या सर्व खजिन्याची माहिती करुन घेयची असल्यास महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत  कार्यरत असलेल्या रमेश पडवळ सरांनी लिहलेल्या 'नाशिक डायरी या पुस्तकाखेरीज दुसरा उत्तम पर्याय तो कोणता? नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक च्या संग्राहालयात असलेले हे पुस्तक मी नुकतेच वाचले.रमेश पडवळ सरांनी नाशिकवर हे पुस्तक धरुन ५पुस्तके लिहली आहेत.त्यापैकी मी वाचलेले हे दुसरे पुस्तक. मी या आधी त्यांचे...