सिंहावलोकन भारत आणि जग (शेजारील देश वगळून )
आता नवीन वर्ष सुरु होण्यास एका आठवड्या पेक्षा कमी वेळ राहिला आहे पुढील वर्षात आपण या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या बाबत या वर्षात काय काय झाले याची उजळणी करणे आवश्यक. जी बाब वैयक्तिक आयुष्यात लागू होते,तीच बाब देशासाठी सुद्धा लागू होते.देशाची नविन वर्षात अधिक प्रगती होण्यासाठी देशाची विविध क्षेत्रातील सरत्या वर्षातील कामगिरी जवाबदार नागरिक या नात्याने आपणास माहिती असणे अत्यावश्यक चला तर जाणून घेवूया त्याविषयी.या लेखात मी भारताचे शेजारील देश वगळून अन्य देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध कसे राहिले ?याविषयी सांगणार आहे? तर मित्रांनो, शेजारील देश वगळता अन्य जगाचा विचार करता पश्चिम आशियातील देश हा एक महत्तवाचा घटक आहे.या देशातील कतार या देशाबरोबरचे संबंधात मधूरता आली वर्षाची अखेर होताना, कुवेत देशाकडून त्यांचा सर्वोच्च नागरी, ' विसम मुबारक अल कबीर' हा पुरस्कार मोदींना देण्यात आला. आखाती देशांनी व्यापारवृढीसाठी गल्फ कंट्री कार्पोरेशन या नावाने संस्था स्थापन केली आहे.जीला संक्षिप्त स्वरूपात जी.सी.सी. म्हणतात.या जी.सी...