मराठी गझल विश्वातील उत्तम पुस्तक, 'आतल्या आत मी'
आपल्या मराठीला साहित्याची मोठी परंपरा आहे कथा कादंबरी नाटक कविता निबंध चरित्रे प्रवासवर्णने यासारखे अनेक प्रकार आपल्या मराठी साहित्यात रूढ आहेत. या मुख्य प्रकारांचे अनेक उपप्रकार सुद्धा आहेत जसे कविता हा एकच प्रकार जरी विचारात घेतला असता कवितांचे वृत्तबद्ध कविता, मुक्त छंद कविता, चारोळी हायकु, गझल असे विविध उपप्रकार आढळतात. कवितेच्या विविध प्रकारांवर आधारित अनेक पुस्तके मराठीत आहेत. व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक असलेल्या नाशिकच्या संतोष हुंडलीकर यांनी लिहिलेला आतल्या आत मी हा काव्यसंग्रह त्यापैकीच एक. मूळचा उर्दू भाषेत असलेला मात्र मराठी साहित्यिक सुरेश भट यांनी मराठीत रूढ केलेला गझल हा काव्यप्रकार यामध्ये हाताळण्यात आलेला आहे. हा मराठी गझल काव्यसंग्रह मी नुकताच वाचला एकूण 87 गझल या काव्यसंग्रहात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्या सर्वच गझल खूपच सुंदर आहेत. उत्कृष्ट गझलेचा कसोट्या असणाऱ्या रदिक,काफिया आणि अलामत आणि वृत्त यांचे उत्तम भान या गझलांमध्ये राखलेले आपणास दिसते.सखोल आणि अथांग आशय याचा देखील या गझल रचनांमध्ये उत्तम पद्धतीने भान राखल्याचे या रचनांचे ...