पोस्ट्स

एप्रिल १४, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेल्वेचे काहीसे उशिरा पडलेले मात्र अतिशय उत्तम पाऊल 'रेल वन ऍप्लिकेशन'

इमेज
  आपल्या  भारतातील प्रशासन मोठे अजिब रसायन आहे.नागरिकांच्या सोयीसाठी उपाययोजना करताना संबंधित यंत्रणा नक्की कोणता विचार करतात ? याचा अंदाज बांधता येणे भल्याभल्या देखील शक्य होणार नाही अश्या प्रकारचा या यंत्रणांच्या कारभार असतो.  मात्र नंतर आलेले अनुभव लक्षात घेत  या उपाय योजनेत मोठ्या प्रमाणात बदल होतात हेही तितकेच खरे.  हे बदल बघितले तर हे बदल आधीच का केले नाहीत ? असा प्रश्न सर्वसाम्यांना नक्कीच पडेल असे या यंत्रणेचे काम असते. अगदी रेल्वेसारख्या जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतुकीचा  उपक्रम देखील या कचाट्यातून सुटलेला नाही रेल्वेचे 'रेल वन हे ऍप्लिकेशन'  हे याचे एका उत्तम उहदाहरण म्हणता येईल  रेल्वेचे अनरिझर्वड तसेच रिझर्वेशन करणे , गाड्यांची सध्याची स्थिती बघणे आपल्या रिझर्वेशनची स्थिती बघणे,पास काढणे दोन स्टेशन दरम्यान किती ट्रेन धावतात त्यांची डब्यांची स्थिती काय आहे ? प्रवासादरम्यान खाण्याची सोय करणे,रेल्वेकडून काही मदत मागवणे, रेल्वेच्या कारभाराबाबत तक्रारी करणे, प्रवासादरम्यान कंटाळा येऊ नये म्हणून मनोरंजनाची सोय करणे, रेल्वेबाबतची छान छ...

तीन दिवस, तीन स्थळे रेल्वेमार्फत ... 

इमेज
व्यक्तींनी त्यांच्या धावपळीच्या  आयुष्यात काही वेळ तरी त्यांच्या छंदासाठी द्यावा.छंदासाठी दिलेला वेळ आणि खर्च केलेला पैसे ही वेळ आणि पैशाची उधळपट्टी नसते.  तर धावपळीच्या आयुष्यात जगताना दमछाक होऊ नये, रोजच्या आयुष्यात जगताना सामोरे जावे लागणाऱ्या ताणतणावांना सहजतेने  सामोरे जाता यावे,  म्हणून ताकद मिळावी यासाठी केलेली ती गुंतवणूक असते, असे अनेक  मानसशास्त्रज्ञ सातत्याने सांगताना आपण ऐकतो, बघतो.  हिंदी आणि मराठी भाषेत छंदाचे महत्व सांगणारे 'जब वी मेट' सारखे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर आपल्या रोजच्या आयुष्यातील हेच छंदाचे महत्त्व लक्षात घेत रोजच्या धावपळीतून काहीसा ब्रेक घेत काही दिवसापूर्वी  मी ३ दिवसात तीन स्थळे बघितली. विशेष म्हणजे माझ्या नेहमीच्या एसटी बस चा माध्यमातून ही स्थळे बघण्याच्या ऐवजी मी ही स्थळे बघितली ती रेल्वेच्या माध्यमातून.  पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वे सुटण्याची वेळ,  स्थळ दर्शनाचा कालावधी, माघारीचा कालावधी लक्षात घेत साधारणतः सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे स्थानकावर परत येता येईल, असा विचार करत मी ही स्थळे ...