सिंहावलोकन २०२६: क्रीडा क्षेत्र
लवकरच जग सध्या सुरु असलेल्या ग्रेनीयन कॅलेंडरला निरोप दूवून नविन ग्रेनीयन वर्ष २०२६चे मोठ्या जल्लोषात स्वागत करेल.हे करत असताना , सरत्या वर्षात झालेल्या घटनांचा मागोवा घेतल्यास पुढल्या वर्षाचे स्वागत करताना येणारा उत्साह उत्तमच.हेच लक्षात घेवून मी क्षेत्र , विषयनिहाय सरत्या वर्षाचे आढावा घेणारे लेख लिहित आहे. त्याच मालिकेतील क्रीडा विश्वाचा आढावा घेणारा हा लेख. हे सरते वर्ष क्रीडा क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या ठरले . भारताच्या अनेक खेळडूनी या वर्षात अत्यंत महत्वाचा टप्पा सर केला बुद्धिबळाचा विचार करता हे वर्ष खूपच आनंदाचे ठरले २०२5 हे वर्ष भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी व्यावसायिकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि पायाभूत विकास यांचा संगम दर्शवणारे ठरले. ऑलिम्पिक सायकलच्या तयारीच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारांनी प्रशिक्षण, विज्ञानाधिष्ठित कोचिंग आणि खेळाडूंच्या कल्याणावर भर दिला. क्रीडा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ‘खेलो इंडिया’ अंतर्गत वार्षिक गुंतवणूक सातत्याने वाढत असून, देशभरात १,००० हून अधिक प्रशिक्षण केंद्रे सक्रिय झाली. अॅथ...