,कोरोना पश्च्यातील चीन उलगडणारे पुस्तक, 'चीन, रंग आणि ढंग',
गेल्या दोन तीन वर्षापासून मराठीत विविध विषयांवर माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत . पुर्वी या विषयांवर मराठीत अभ्यासपुर्ण पुस्तक येणे शक्यच नाही असे वाटे , त्या विषयांवर देखील माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत . जे अत्यंत उत्तमतेचे लक्षण म्हणता येईल . सातत्याने वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह , भारताच्या परराष्ट्र धोरणावर परीणाम करणाऱ्या चीन सारख्या देशांवर देखील आता मोठ्या संख्येने पुस्तके निघत आहेत . याच मराठी पुस्तकांमध्ये समावेश होवू शकेल असे एक पुस्तक , मी नूकतेच वाचले .' चीन , रंग आणि ढंग ', या ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ . अनंत पा . लाभसेटवार यांनी लिहलेल्या या पुस्तकात कोव्हिड नंतरच्या जगात चीनचे आर्थिक , राजकीय , आणि लष्करी स्थान काय असेल . याबाबत माहिती मिळते . सुमारे पावणेतीनशे पानाचे हे पुस्तक , चीनचे नेतृत्व , राजकारण , अर्थकारण , करोनाचे हत्याकांड या चार भागात विभागले आहे . प्रत्येक भा...