पोस्ट्स

मार्च २३, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवी आयुष्यातील छंदाचे महत्त्व स्पष्ट करणारा चित्रपट,' जब वी मेट'

इमेज
चित्रपट हे मोठे सशक्त माध्यम आहे‌.मनोरंजनाबरोबर चित्रपटातून मोठा संदेश देता येतो, आणि तो देण्यात येतो देखील. निव्वळ टाईमपास फालतू प्रेमकथांचे चित्रपट म्हणून ज्या बॉलिवूडचा उल्लेख होतो ते देखील याला अपवाद नाहीये. बॉलिवूडच्या चित्रपटातून जीवनाविषयक अनेक बाबी आपणास समजतात. याच मालिकेतील  जीवनाबाबत मोठे शिक्षण देणारा एक उत्कृष्ट  चित्रपट म्हणून 25 ऑक्टोबर 2007 रोजी प्रदर्शित झालेला 'जब वी मेट' कडे बघता येईल.         स्वत:च्या निर्णयाची जवाबदारी स्वत:कडे  कोणत्या प्रकारे घेयची‌.ते निर्णय फसले  तरी त्याबाबत दुसऱ्याला  दोष न देता त्याही स्थितीत स्वतः अपयशाची  जबाबदारी घेत, त्याला हसत हसत सामोरे  कसे जायचे.आयुष्यात छंदाचे महत्त्व काय असते? हे महत्त्वाचे संदेश या चित्रपटातून देण्यात आले आहेत.       मनुष्य त्याच्या रोजच्या जगण्यात कितीही व्यस्त असला तरी मनुष्याने त्याच्या छंदासाठी काही वेळ काढला पाहिजे.छंदामुळे वेळ वाया जात नाही, तर व्यक्तीस रोजच्या जगण्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विशेष बळ मि...