पोस्ट्स

एप्रिल २६, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सदैव चिरतरुण असणारा चित्रपट, 'सिंहासन'

इमेज
आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत मोठा आशय असलेले अनेक चित्रपट आहेत.दोघी, नितळ, देउळ, देउळबंद, दहावी फ, सामना ,सरकारनामा ही त्यातील काही मोजकी उदाहरणे. मराठी चित्रपटसृष्टीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर आधारीत चित्रपट दिले आहेत. पत्रकारीतेचा विचार करता  हार्ड  बीट समजल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारीत चित्रपट मराठीत आहेत. सरकारनामा, सिंहासन ही त्यातील प्रमुख उदाहरण म्हणता येईल  सिंहासन हा चित्रपट तर समस्त भारतीय भाषेतील उत्कृष्ट  चित्रपट म्हणता येईल.16 नोव्हेंबर 1979 रोजी रसिकांसाठी खुला झालेला  या  चित्रपटाला 46 वर्ष पूर्ण होतील मात्र आजदेखील या चित्रपटाचे कथानक रटाळ कालबाह्य वाटत नाही . किंबहुना आज आपण बातम्यांमध्ये ज्या राजकारणाच्या बातम्या बघतो ,त्याचे नाट्य रूपांतरण वाटावे इतका सजीवपणा या चित्रपटात जाणवतो ,     हा चित्रपट त्याच्या पहिल्या दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो  सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुबई (त्यावेळचे  व्हिटोरीया टर्मिनस ) च्या परिसर त्याच्या पहिल्या दृश्यात दाखवला आहे जो सुरवातीला लॉंग  शॉर्ट  फोकस ...