कांदे पोहे
कांदे पोहे, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या अति परीचयातील पदार्थ. विवाह जूळवतांना पुर्वी हमखास केला जाणारा पदार्थ. तर माझ्या सारख्या मुळच्या नाशिकमधील मात्र शिक्षण आणि नोकरीच्या निमित्त्याने पुण्यातील पेठांमध्ये बरेच काळ वास्तव्य केलेल्या व्यक्तींचा रोजच्या जगण्याची सुरवात करणारा पदार्थ. सहजतेने पाच मिनीटात तयार होणारा हा पदार्थ .सध्या बाजारात कांद्यांचे आणि शेगदाण्याचे भाव किती आहेत याचा बातम्या न बघता, बाजारात न जाता अत्यंत खराखुरा वृत्तांत सादर करणारा खाद्यपदार्थ म्हणजे कांदेपोहे. आपल्या चित्रपटसृष्टीत, साहित्य विश्वात कांदेपोहे हा मोठा विषय आहे.सनई चौघडे या मराठी चित्रपटात तर आयुष्य म्हणजे कढईतील करपलेले कांदेपोहे असे सांगत, कांदे पोह्यांना आयुष्यातील भल्याबुऱ्या प्रसंगाशी जोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात कधीही नाश्त्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे. तर गरमागरम कांदेपोहे आणि त्यावर लिंबू पिळल्यावर असे कांदेपोहे खाणे हणजे रस्त्यावरचे स्वर्गसुख म्हणता येईल. मात्र काही कारणाने आपल्या महाराष्ट्रात सध्या या कांदा पोह्यांची वाट ल...