एका दुर्देवी प्रेम त्रिकोणाचा समग्र वेध घेणारे पुस्तक ' व्यस्त ओढीचा त्रिकोण'
आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. यातील काही कहाण्या या आनंदायी आहेत . तर काही प्रेम कहाण्यांना मात्र दुर्दैवाची कारुण्याची छाया आहे . या दुःखाची पार्श्वभूमी असलेल्या प्रेम कहाण्यांमध्ये अग्रक्रमामाने नाव येते ते , गुरुदत्त गीता दत्त आणि वहिदा रेहमान. या जोडीचे . एकीवर नितांत प्रेम असून देखील व्यावसायिक कारणास्तव जवळ आलेल्या एका दुसऱ्या व्यक्तिमत्वामुळे अक्षरशः कोंडीत सापडलेल्या गुरुदत्त यांचा या दुर्दवी मृत्यू या प्रेम कहाणीत झाला . त्यांच्या मृत्यूमुळे आपण एका प्रतिभावंत, कामाप्रती अत्यंत निष्ठावान असेलेल्या, प्रयोगशील, मात्र मनस्वी हळव्या अश्या अत्यंत हुशार असलेल्या एका ससिने अभिनेत्यासह सिने दिग्दर्शक सिने निर्मेत्यास सिने दिग्दर्शकास आपण तयां अकाली गमावलं . आपल्या बॉलीववूडची खूप मोठ्या प्रमाणात हानी यामुळे झाली त्यांचे एक्ली निधन झाले नसते तर आपण आतापर्यंत आपल्यापासून दूर असलेली ऑस्करची बाहुली अनेकदा पटकावली असती याबाबत कोणाशी शंका नसावी . गुरुदत्त यांच्या या अकाली जाण्याविषयी अनेकदा अ...