इस्रोच्या मानाच्या शिरपेचात अजून एक तूरा
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो दिवसोंदिवस जगाचा अधिकाधिक विश्वास संपादन करत आहे.२०२३ची जगातील सर्वोत्तम अंतराळ संशोधन संस्था म्हणून पुरस्कार मिळाल्यानंतर, तर त्यात झपाट्याने वाढच होताना दिसत आहे. त्यामुळेच ५ डिसेंबर रोजी युरोपीय स्पेस एजन्सीच्या महत्तकांक्षी प्रोब ३चे प्रक्षेपण करण्याची संधी इस्रोला मिळाली.जिचे सोने करत इस्रोने प्रोब३ चे यशस्वी प्रक्षेपण करत, आपली गुणवत्ता सिद्ध केली, आणि स्वत:च्या शिरपेचात मानाचा तूरा देखील रोवला. त्याबद्दल इस्रोच्या सर्व संशोधकांचे करावे तितके कौतूक कमीच आहे.इस्रोने या आधी दुसऱ्या संस्था,देश यांचे उपग्रह स्वत:च्या उपग्रह प्रक्षेपण यानातून प्रक्षेपित केलेले असले तरी आताचे आव्हान मोठे होते.प्रोब ३या मोहिमेत दोन उपग्रह हाकेच्या अंतरावर प्रक्षेपित करायचे होते.यामध्ये अत्यंत कमी काही मिलमिटरचा देखील फरक पडला असता तर मोहिम अयशस्वी ठरली असती,आणि कोट्यावधीचा खर्च वाया गेला असता,इस्रोच्या अभियंतांनी हे आव्हान स्विकारले आणि खरे करुन दाखवले सुद्धा. इस्रोमार्फत अत्यंत कमी खर्चात अंतराळ म...