काश्मिरी पंडितांची सखोल माहिती देणारे पुस्तक,' काश्मीर आणि काश्मिरी पंडित'
काश्मिरी पंडित भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय, त्यांचे काश्मीर खोऱ्यातील विस्थापन आणि आणि पुन्हा स्थापनेचे प्रयत्न याविषयी अनेक माध्यमात अनेक व्यक्तींकडून वारंवार बोलण्यात आलेले आहे. मात्र तरी देखील वारंवार चर्चा होणारा विषय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरमधून 370 कलम हटवल्यावर तर या विषयावर सातत्याने चर्चा होऊ लागल्या. या चर्चांमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे योग्य पद्धतीने समजण्यासाठी आपल्याला सर्व विषय काही प्रमाणात माहिती असणे आवश्यक. शिक्षण तज्ञांच्या मते कोणताही विषय मातृभाषेत समजल्यास अधिक उत्तम ठरते. आपल्या मराठी भाषिकांच्या सुदैवाने नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव सुद्धा नसलेल्या घोटी या गावातील मधुश्री प्रकाशन आपली ही अडचण दूर करते. मधुश्री प्रकाशनाच्यातर्फे कश्मीर अँड कश्मीरी पंडित या मूळच्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा मराठीत अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे या अनुवादित पुस्तकांमळे आपणास काश्मिरी पंडित हा विषय सहजतेने आणि सखोलतेने समजतो. नाशिक मधील महत्वाची सांस्कृतिक संस्था असलेल्या सावनाच्...