पोस्ट्स

मार्च १७, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शनी ग्रहाविषयी या बाबी आपणास माहिती आहेत ना !

इमेज
शनी नाव ऐकताच अनेकांना धडकी भरणारा ग्रह. साडेसातीमुळे ज्योतिषशास्त्रात प्रसिद्ध असलेला ग्रह. मात्र हा शनी ग्रह खुपच रंजक आहे‌. गेल्या काही दिवसांमध्ये  खगोलशास्त्राचा विचार करता दोन गोष्टीमुळे हा ग्रह विशेष चर्चेत आलायं. त्या गोष्टी आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन           तर मित्रांनो साडेसाती वगळता शनी म्हटल्यावर जी गोष्ट लगेच समोर येते,ती म्हणजे त्याचे कडे. शनीखेरीज गुरु, युरेनस, नेपच्युन या ग्रहांना देखील कडे असले तरी कडी असलेला ग्रह म्हटल्यावर नाव समोर येते ते शनीचेच.माझे खगोलशास्त्रप्रेमी मित्र आहेत ते जेव्हा जाहीर आकाशदर्शनाचे कार्यक्रम करतात तेव्हा लोक त्यांना शनीच्या कडी दुर्बिणीतून दाखवा असी मागणी करत असतात. ही कडी निर्माण होण्याचा दोन शक्यता सांगितल्या जातात.त्यातील पहिली म्हणजे काही कारणाने लाखो वर्षापुर्वी शनीचा एका उपग्रह काही अज्ञात कारणाने खुपच जवळ आला त्यामुळे त्या उपग्रहावरील शनीचे गुरुत्वाकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले या वाढलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या उपग्रहाचे तूकडे झाले जे आपण शनीच्या कड्याचा रुपात बघत आहोत.एखादा खगोलीय...